पुढारी ऑनलाईन डेस्क : सूरज आर बडजात्या दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांचा समावेश (68th Filmfare Award ) असलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या उंचाईला प्रतिष्ठित ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२३ च्या आवृत्तीत ७ पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. नामांकनांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन. (68th Filmfare Award )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष) – अनुपम खेर.
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम – अमित त्रिवेदी.
सर्वोत्कृष्ट कथा – सुनील गांधी.
सर्वोत्कृष्ट संवाद – अभिषेक दीक्षित.
'उंचाई'चे सहनिर्माते महावीर जैन यांनी चित्रपटाच्या निर्मितीबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या. प्रतिष्ठित फिल्मफेअर ॲवॉर्ड्समधून उंचाईला नॉमिनेशन मिळाल्याबद्दल आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. आम्हाला चित्रपटासाठी मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
जैन म्हणाले, उंचाईच्या यशाचे श्रेय आमचे कर्णधार सूरज आर बडजात्या यांना आहे. बच्चन साब हे संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणा आहेत. अनुपम यांनी आपल्या प्रतिभासंपन्न प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले. डॅनी, बोमन, नीना, सारिका आणि परिणिती या कलाकारांचे कामही अफलातून आहे. उत्कृष्ट संगीत अल्बमसाठी अमित त्रिवेदी, इर्शाद कामिल, कथेसाठी सुनील गांधी, संवादांसाठी अभिषेक दीक्षित, डीओपी मनोज खतोई, उंचाईची संपूर्ण टीम यांना धन्यवाद.
६८ व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२३ चे आयोजन २७ एप्रिल रोजी मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे.