

माधुरी दीक्षित ‘मिसेस देशपांडे’ या चित्रपटात पहिल्यांदाच एक दमदार, रहस्यमय आणि अॅक्शनने भरलेली गृहिणीची भूमिका साकारत आहे. “ती देखणी आहे… पण किलर आहे!” या टॅगलाइनने उत्सुकता वाढली असून तिचा हा महिला-केंद्रित चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे.
Madhuri Dixit Mrs. Deshpande Streaming on the day
मुंबई : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आली आहे. नृत्य, अभिनय आणि तिचं मोहक हास्य म्हणजे माधुरीची खासियत. पण यावेळी ती एका अशा भूमिकेत झळकणार आहे जी तिच्या फॅन्सनी कधीही पाहिलेली नाही. 'मिसेस देशपांडे' या नावाच्या नव्या चित्रपटात माधुरी एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार असून निर्मात्यांनी तिच्या भूमिकेचे पहिलेच लुक-टिझर प्रदर्शित केले आहे. . 'मिसेस देशपांडे' मध्ये खूप काही दडलेलं आहे. जिओहॉटस्टारने माधुरी दीक्षितच्या मुख्य भूमिकेतील या बहुचर्चित थ्रिलरचा प्रीमियर जाहीर केलाय.
थरकाप उडवणारा टीझर मिसेस देशपांडेच्या जगात डोकावायला लावणारा आहे. माधुरी, एक साधा, डी-ग्लॅम अवतार धारण करून, शांतपणे भाजी चिरत असते, आणि रेडिओवर एक सिरिअल किलर पळून गेल्याची बातमी सुरू असते.
नागेश कुकुनूर दिग्दर्शित ही अप्लॉज एंटरटेनमेंट आणि कुकुनूर मूवीज निर्मित सीरीजमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियांशू चॅटर्जीही महत्त्वाच्या भूमिकेत असतील.
काय म्हणाली माधुरी दीक्षित?
''मिसेस देशपांडे ही मी कधीही केलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती रॉ आहे, अनफिल्टर्ड आहे, आणि माझ्याशी नेहमी जोडल्या जाणाऱ्या ग्लॅमरपासून खूप दूर आहे. इतक्या ग्रे शेड्स असलेली भूमिका साकारणं थरारकही होतं.''
दिग्दर्शक नागेश कुकुनूर म्हणाले, ''मिसेस देशपांडे माझ्यासाठी अतिशय विलक्षण आणि आनंददायी प्रवास ठरला. स्क्रिप्टवर काम करत असताना मला या भूमिकेत फक्त माधुरीच दिसत होती, आणि एवढ्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेची भूमिका तिने साकारली हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे.''
आता माधुरी नव्या अवतारात १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांसमोर येणार आहे.