

अहान पांडे आणि ऐश्वर्य ठाकरे एका नवीन प्रोजेक्टमध्ये निगेटिव्ह भूमिकेत दिसणार असून या दोघांत जोरदार आमनेसामने संघर्ष पाहायला मिळणार आहे. तरुण कलाकारांच्या या भिडंतीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
Ahaan Pandey-Aishwarya Thackeray upcoming movie updates
मुंबई - ऐश्वर्य ठाकरे आणि अहान पांडे आता नव्या भूमिकेतून समोर येणार आहे. यावेळी त्यांची निगेटिव्ह भूमिका असणार आहे. अनुराग कश्यप यांच्या निशांचीमध्ये ऐश्वर्य ठाकरे तर सैयारामध्ये अहान पांडेने भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या भूमिकेमध्ये जबरदस्त आमने-सामने संघर्ष पाहायला मिळणार आहे.
अहान पांडेने सोशल मीडियावरून आणि वेब प्रोजेक्ट्समधून आपली मजबूत प्रतिमा केलीय. दोन्ही स्टार्स उत्तम अभिनय, दमदार व्यक्तीमत्वामुळे प्रेक्षकांचा आवडता स्टार बनले आहेत. दुसरीकडे, ऐश्वर्य ठाकरेनेही आपल्या स्टाइलिश लुक्स, क्लासिक स्क्रीन लूक आणि अभिनयामुळे स्वतःचं स्थान तयार केलं आहे. दोघांच्या भूमिकाही एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत.
कोण आहे ऐश्वर्य ठाकरे?
ऐश्वर्य ठाकरे हा बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. अनुराग कश्यपच्या निशांची चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता.
अली अब्बास जफर यांनी सुल्तान, टायगर जिंदा है ब्लडी डॅडी यासारखे चित्रपट दिले आहेत. आता अहान आणि ऐश्वर्य यांच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. २०२६ पर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरु होईल, असे म्हटले जात आहे.