Dipika Kakkar | टारगेटेड थेरेपीचे साईड इफेक्ट्स; ढसाढसा रडली दीपिका कक्कड

Dipika Kakkar |टारगेटेड थेरेपीचे दुष्परिणाम; दीपिका कक्कड भावूक, अश्रू अनावर
Dipika Kakkar
Dipika Kakkar reacts during cancer treatment Instagram
Published on
Updated on
Summary

दीपिका कक्कडने टारगेटेड थेरेपीचे दुष्परिणाम सांगताना भावनिक होत अश्रू ढाळले. थकवा आणि भावनिक ताणामुळे ती अडचणीत असल्याचे तिने सांगितले. चाहत्यांनी तिच्यासाठी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Dipika Kakkar reacts during cancer treatment she cried

मुंबई - टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड कॅन्सरच्या उपचारावेळी रडू लागली, यावेळी तिचा पती शोएब इब्राहिमने तिला समजावलं. सर्व काही ठिक आहे पण, भीती वाटू लागते, असे म्हणताना तिला रडू कोसळलं. यावेळी इब्राहिमने तिला सावरलं. तिने तिच्या vlog मध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत.

Dipika Kakkar
Rinku Rajaguru Asha Teaser | रिंकू राजगुरु घेऊन आली 'आशा', नव्या चित्रपटाचा टीझर पाहिला का?

दीपिका कक्कड नुकताच डॉक्टरांना भेटायला गेली आणि ती रडू लागली. दीपिकाला लिव्हर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. त्यांनी सांगितलं की, रिपोर्ट्स तर ठिक आहेत. पण, नेहमी मनात भीती वाटत राहते, सगळं ठिक होवो.

Dipika Kakkar
Ahaan Pandey-Aishwarya Thackeray | दोन तरुण अभिनेत्यांमध्ये जोरदार सामना; अहान पांडे-ऐश्वर्य ठाकरे निगेटिव्ह भूमिकेतून समोर

आता तिच्यावर टारगेटेड थेरेपी सुरु आहे. दीपिका कक्कड खूप अडचणीतून जात आहे. तिला अनेक साईड इफेक्ट्स आणि समस्या झेलत आहे. दीपिका ऑन्कोलॉजिस्टला भेटायला गेली आणि रडू लागली. दीपिका म्हणू लागली की, उपचारादरम्यान, तिला भीती आणि एंग्जायटी होऊ लागते. दीपिकाने आपल्या या इमोशनल मोमेंट विषयी लेटेस्ट व्लॉगमध्ये सांगितलं. ती म्हणाली की, डॉक्टरांना भेटण्यादरम्यान, ती स्वत:ला सावरू शकली नाही आणि रडू लागली. तेव्हा पती शोएब इब्राहिमने तिला सावरलं.

दीपिकाची लिव्हर कॅन्सरची ३ जून, २०२५ रोजी सर्जरी करण्यात आली होती. दीपिकाने सांगितलं होतं की, सर्जरी दरम्यान डॉक्टरांनी तिच्या लिव्हरचे २२ टक्के हिस्सा कापून टाकला होता. चांगली बाब म्हणजे कॅन्सर केवळ लिव्हरपर्यंत मर्यादित राहिले, शरीरात पसरले नाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, दीपिकाच्या लिवरमध्ये ११ सेंटीमीटरचा ट्यूमर होता.

आता दीपिका कक्कड ठिक होत आहे. उपचारादरम्यान, तिचा थायरॉईड लेवल वर-खाली होत आहे. हॉर्मोन्स चेंज होत आहेत. ज्यामुळे कधी कान आणि गळ्यात प्रेशर तर कधी स्किन एकदम ड्राय होते. पण, तिच्यावर उपचारा योग्य सुरु अशल्याने ती आनंदात आहे. रिपोर्ट्स देखील ठिक आहेत.

व्लॉगमध्ये दीपिकाने म्हटलं की, 'सर्व ठिक आहे. रोज एक-एक दिवस नव्या गोष्टी होत राहतात. त्याचा सामना करत मी पुढेजात आहे. आज थोडी भावूक होत आहे. पण मनात जी भीती आहे, ती कधी कधी खूप त्रासदायक ठरते.'

टारगेटेड थेरेपीचे साईड इफेक्ट्स

दीपिकाने सांगितले की, प्रत्येक दिवशी नव्या आव्हानांचा सामना करावा लागता. पण ती नव्याने स्वत:ला मजबूत ठेवते. दीपिका आता टारगेटेड थेरेपी घेत आहे. दोन वर्षांपर्यंत ही थेरपी असेल. या थेरेपीमध्ये शरीरमधील शिल्ल असलेल्या कॅन्सर कोशिकांना मुलापासून संपुष्टात आणले जाते. पण या थेरेपीने अनेक साईड इफेक्ट्स होऊ लागतात, जसे की केस गळणे, तोंड येणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news