मधूर भांडारकर यांनी दिली गुड न्यूज ! बबली बाऊन्सर लवकरच येणार

Tamannaah bhatia
Tamannaah bhatia
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे मधूर भांडारकर. रसिक 'चांदनी बार', 'पेज ३', 'फॅशन', असे अनेक लोकप्रिय चित्रपट देत त्यांनी रसिकांच्या मनात ठसा उमटवला आहे. भांडारकर सोशल मीडियावरही सक्रीय असतात. त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. यात त्यांनी चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे. ही न्यूज आहे त्यांचा आगामी चित्रपट बबली बाऊन्सर बाबतची.

भांडारकर यांनी सोशल मीडिया अॅप 'कू'वर एका खास व्हिडिओसह पोस्ट शेअर करत म्हटले आहे, "सलग ३ महिने ४२ दिवस. आता शूटिंग संपले आहे. या काळातल्या आठवणी खूपच खास आहेत. माझे सगळे कलावंत, तंत्रज्ञ आणि ज्या सगळ्यांनी सुरवातीपासून शेवटपर्यंत भक्कम साथ दिली त्या सगळ्यांचे खूप आभार.

भांडारकर यांनी पोस्ट केलेल्या फोटोत ते तमन्ना भाटियासह क्लॅपबोर्ड धरून आनंदात पोज देताना दिसत आहेत. सगळ्या टीमने शूटिंग यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद केक कापून साजरा केला. तमन्ना भाटियाची मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मधूर भांडारकर यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि जंगली पिक्चर्सची ही निर्मिती आहे.

या चित्रपटात तमन्ना भाटियासह अभिषेक बजाज, साहिल वैद आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news