R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो..वडिलांनी काय दिली होती प्रतिक्रिया
image of R. Madhavan
R. Madhavan Kolhapur connection Instagram
Published on
Updated on

R. Madhavan Kolhapur connection

मुंबई - अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप जैसा कोई' आज ११ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. या चित्रपटांवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी चित्रपटाला थ्री-स्टार्स दिलेले आहेत. आर माधवन आणि कोल्हापूरचा जवळचा संबंध आहे. जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात आला, तेव्हा काय घडलं होतं? इथे काही काळ राहून त्याने काय केलं? कोल्हापुरातल्या फूडविषयी त्याने काय म्हटलं होतं? जाणून घेऊया.

image of R. Madhavan
Instagram

जेव्हा पहिल्यांदा आर माधवनचे वडील कोल्हापुरात आले...

एका मुलाखतीत आर माधवनने कोल्हापूर विषयी भरभरून सांगितलं होतं. त्याठिकाणच्या आठवणी सांगताना तो म्हणाला होता, 'कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर आम्ही टॅक्सी, रिक्षाच्या शोधात होतो. एक रिक्षा मिळाली, ज्यामध्ये पूजा वगैरे केली होती..अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. आम्ही त्यामध्ये बसलो. रिक्षा चालकाने महालक्ष्मी स्तोत्र टेपवर लावलं होतं. हे ऐकून माझे वडील खूप खुश झाले आणि ते म्हणाले की, हा..ही सिटी तुझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे.'

image of R. Madhavan
Instagram

जवळपास पाच वर्षे माधवन कोल्हापूरमध्ये राहायला होता. साधारण तो १९९१-१९९५ चा काळ असावा, असे जुने जाणकार सांगतात. तो दक्षिणात्य पण महाराष्ट्रात येऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केलं. इलेक्ट्रॉनिक्सच्या उच्च शिक्षणासाठी तो कोल्हापुरात आला. शिवाजी विद्यापीठाजवळच्या राजाराम महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. एका हॉस्टेलमध्ये राहू लागला. काही वर्ष बॉईज हॉस्टेल आणि भाड्य़ाच्या खोलीतदेखील तो राहिला. अभ्यासासाठी तो शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात जात असल्याचंही सांगितलं जातं. इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी मिळवल्यानंतर आर. माधवनने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पब्लिक स्पीकिंगचे वर्ग सुरु केले होते.

image of R. Madhavan
Aankhon Ki Gustaakhiyan | शनाया कपूरच्या चित्रपटाचे ओपनिंग निराशाजनक; बॉक्स ऑफिसवर सटकून आपटला ‘आंखों की गुस्ताखियां’
image of R. Madhavan
Instagram

आर. माधवन मुलाखती म्हणाला होता, ''कॉलेजमध्ये शिकत असताना विश्वास नांगरे पाटील, संभाजीराजे छत्रपती यांच्यासारख्या दिग्गजांशी माझी मैत्री झाली होती. आज ते मोठ्या पदावर आहेत, कोणी कमिशनर, कोणी खासदार आहे. मी मानतो माझ्यासाठी खूपच भाग्यवानाची गोष्ट आहे की, मी महालक्ष्मीच्या कोल्हापूर शहरात गेलो, आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादाने मला असे चांगले मित्र भेटले. अशा मित्रांसाठी मला ऑक्सफर्ड, हॉवर्ड याठिकाणी जावं लागलं नाही.''

image of R. Madhavan
Son Of Sardaar 2 Trailer: 'सन ऑफ सरदार २'चा ट्रेलर, मृणाल-अजय देवगन नव्या लूकमध्ये
image of Kolhapuri Misal
Kolhapuri Misal Reeva Photo

'कोल्हापुरी मिसळीचा कट अख्ख्या जगात नाही मिळणार'

आणखी एका मुलाखतीत आर. माधवन म्हणाला होता, ''आपल्याला कोल्हापूरची झणझणीत मिसळ-पाव खूप आवडते. यामध्ये मिसळवर असणारा जो "कट" असतो, तो जगात कोठेही बनू शकत नाही. तो खाल्ल्यावर तुमच्या जिभेला झिणझिण्या येतात. पण त्याची टेस्ट इतर कुठल्याच ठिकाणी मिळणार नाही.''

image of R. Madhavan
Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news