

Aankhon Ki Gustaakhiyan 1 st day box office collection
मुंबई - अभिनेता विक्रांत मेसी आणि शनाया कपूरचा चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचे वृत्त आहे. चित्रपटाने लाखांची ओपनिंग केल्याची माहिती समोर आलीय. विक्रांत मेसीसोबत शनाया कपूरने रोमँटिक ड्रामा चित्रपटात ‘आंखों की गुस्ताखियां’तून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झाला. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. जाणून घेऊया पहिल्या दिवशी किती कलेक्शन केलं आहे?
मानसी बागलाद्वारा लिखित, संतोष सिंह द्वारा दिग्दर्शित, ‘आंखों की गुस्ताखियां’ रस्किन बॉन्डची शॉर्ट कहाणी "द आइज हॅव इट"वर आधारित आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत एक ब्लाईंड म्युझिशियनची भूमिका साकारलीय. तर शनाया कपूर एक थिएटर कलाकार असते. दोघांची कहाणी एक रेल्वे यात्रा दरम्यान सुरू होते, यानंतर स्टोरीमध्ये अनेक वळणे येतात.
‘आंखों की गुस्ताखियां’ला राजकुमार रावच्या मालिक आणि हॉलीवूड चित्रपट सुपरमॅनशी क्लॅश करावा लागला. ओपनिंग खूप निराशाजनक राहिली. रिपोर्टनुसार, चित्रपट पहिल्या दिवशी ५० लाखांची कमाई देखील करू शकलेला नाही. केवळ ३५ लाख रुपये कमवले असून चित्रपट फ्लॉप झाला आहे.
रिपोर्टनुसार, दुसरीकडे राजकुमार राव स्टारर ३.३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. ‘आंखों की गुस्ताखियां’चे बजेट ५० कोटी सांगितले जात आहे. आता विकेंडला चित्रपट किती कमावणार, याकडे लक्ष लागले आहे.