रणबीर कपूरसाठी भन्साळींचं खास प्लॅनिंग; 'Love and War' बद्दल मोठा खुलासा?

Love And War Update: रणबीर कपूरच्या फॅन्ससाठी खास सरप्राईज, संजय लीला भन्साळी करताहेत प्लॅनिगं
image of vicky kaushal-alia-sanjay bhansali-ranbir
Instagram
Published on
Updated on

sanjay bhansali Surprise for fans on Ranbir Kapoor birthday

मुंबई : संजय लीला भन्साळी रोमँटिक ड्रामा 'लव एंड वॉर' चित्रपटाचा फर्स्ट लुक करण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांनी तारीख देखील निवडली आहे. निर्मात्यांनी रणबीर कपूरच्या वाढदिवसाची तारीख निवडली असून फर्स्ट लूक शेअर करतील.

image of alia-bhatt- ranbir kapoor
Instagram

'लव्ह अँड वॉर'च्या फर्स्ट लूकची प्रतीक्षा

आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर'चे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट, विक्की कौशल आणि रणबीर कपूर यांचे त्रिकूट पाहायला मिळणार आहे. आता लेटेस्ट अपडेट्सनुसार, संजय लीला भन्साळींनी रणबीर कपूरच्या वाढदिनी 'लव्ह अँड वॉर'चा फर्स्ट लूक शेअर करण्याचे नियोजन केले आहे. रणबीरच्या फॅन्ससाठी हे मोठे सरप्राईज असेल. रणबीर कपूरच्या फर्स्ट लूक सोबत आलिया भट्ट आणि विक्की कौशलची झलक देखील मोशन पोस्टरमध्ये दिसेल.

image of vicky kaushal-alia-sanjay bhansali-ranbir
The Bengal Files | कोलकातामध्ये 'द बंगाल फाईल्स' विरोधात कोर्टात याचिका, विवेक अग्निहोत्री संतापले

अनेक रिपोर्ट्समध्ये हे देखील सांगण्यात आले होते की, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'मध्ये प्रियांका चोप्रा आयटम नंबर करताना दिसेल. पण नंतर अपडेट आली की, प्रियांका या चित्रपटात दिसणार नाही. 'लव्ह अँड वॉर' पुढील वर्षी २० मार्च रोजी प्रदर्शित होईल.

image of vicky kaushal-alia-sanjay bhansali-ranbir
Kajol | 'आता मी हिंदीत बोलू?' प्रश्न विचारल्यावर भडकली काजोल; अस्खलित मराठीत बोलली
image of alia-bhatt- ranbir kapoor
Instagram

संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडताच कॅमेराबद्ध

दरम्यान, रणबीर आणि आलियाचे कॅज्युअल लूकमधील फोटो कॅमेराबद्ध झाले. बुधवारी संजय लीला भन्साळी यांच्या मुंबईतील जुहू येथीलऑफिसमधून आलिया भट्टसोबत बाहेर पडताना रणबीर कपूर दिसला. दोघांनी फोटो पोज देखील दिली. रणबीरने आलियाला जवळ ओढले आणि ती त्यावेळी ती लाजली. हा क्षण पापराझींनी कॅमेराबद्ध केला.

रणबीर आणि आलिया यांनी व्हाईट कॅज्युअल आऊटफिट घातला होता. रणबीरने पांढरा गोल-गळ्याचा टी-शर्ट आणि निळा डेनिम घातला होता. ब्लू ओव्हरशर्टने लूक पूर्ण केला होता. दरम्यान, आलियाने पांढरे टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news