

ठळक मुद्दे
६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला
यावेळी अभिनेत्री काजोलने माध्यमांशी हिंदीत बोलण्यास नकार दिला
तिने मराठीत प्रतिक्रिया दिल्या आणि भावना व्यक्त केल्या
Kajol speech in Marathi
मुंबई - काजोलने प्रसारमाध्यम प्रतिनिधींना हिंदीतून बोलण्यास नकार दिला. 'आता पुन्हा हिंदीत बोलू का? ज्यांना समजायचे ते समजतील', अशी संतापजनक प्रतिक्रिया काजोलने दिली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ तसेच ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे पार पडला. यावेळी काजोलने सोहळ्याला उपस्थिती लावली. शिवाय प्रसारमाध्यमांशीही तिने संवाद साधला. यावेळी नेमकं काय घडलं? पाहुया.
माध्यमांशी बोलताना काजोलने मराठीत भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, आता मी हिंदीत बोलू? ज्यांना समजायचं आहे ते समजतील. खूप चांगलं वाटतंय आज मी इथे आहे. आणि मला हा पुरस्कार यादिवशी मिळतोय. माझ्यासाठी मोठा दिवस आहे. मी खूप आनंदित आहे की माझी आई माझ्यासोबत इथे आहे. तिला देखील हा पुरस्कार मिळाला होता.
नमस्कार सगळ्यांना. आज माझा वाढदिवस आहे. सर्वांचे खूप आभार. या मंचावर इकत्या मोठ्या लोकांसोबत उभी आहे. माझ्यासाठी हा सर्वात मोठा दिवस आहे. कारण माझी आई माझ्यासमोर बसली आहे. मी नेसलेली साडी माझ्या आईची आहे. तिला देखील हा पुरस्कार मिळाला होता. माझ्या वाढदिवसादिवशी हा पुरस्कार मिळणे, खूप मोठा दिवस आहे. यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो?