

मल्याळम भाषेतील सुपरहिरो सिनेमा लोकाह चॅप्टर 1 ने बॉक्स ऑफिसवर बरीच लोकप्रियता मिळवली. सुपरहीरो फॅंटसी प्रकारात मोडत असलेल्या या सिनेमाने मोठी कमाईही केली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा मल्याळी सिनेमा लोकाह बनला आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन डॉमिनिक अरुणने केले आहे. (Latest Entertainment News)
हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची वाट चाहतेही पाहात होते. सिनेमाच्या निर्मात्यांनी या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे.
मल्याळम भाषेतील सुपरहिरो सिनेमा लोकाह चॅप्टर 1: चंद्रा जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. हे पोस्ट करताना मेकर्स म्हणतात, ‘ एका नव्या ब्रम्हांडाची सुरुवात लोकाह चॅप्टर 1: चंद्रा लवकरच जियो हॉटस्टारवर.
30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने आतापर्यंत देशभरात 301. 45 कोटींची कमाई केली आहे. तर परदेशातील कमाईचा आकडा 119. 6 कोटी इतका आहे.
अभिनेता दुलकर सलमान याने या सिनेमाची निर्मिती केली आहे. कल्याणी प्रियदर्शन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या सीझनची घोषणाही झाली आहे. अभिनेता टोविनो थॉमस या सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.
मल्याळम भाषेतील सुपरहिरो सिनेमा लोकाह चॅप्टर 1 मध्ये पारंपारिक सुपरहीरो स्टोरी न दाखवता हटके कथानक लक्ष वेधून घेते.
केरळच्या संस्कृती, सामाजिक वास्तव आणि धारणांवर आधारित हा सिनेमा मातीशी जोडत असल्याचे मत अनेक प्रेक्षकांनी नोंदवले.
कोणत्याही इतर सुपरहीरोपेक्षा तिचे सामान्य माणसासारख्या भावना असणे जास्त अपील करून गेले.