2006 साली रिलीज झालेल्या खोसला का घोंसला या सिनेमाचा तब्बल 20 वर्षांनी सिक्वेल बनणार आहे. दीबाकर बॅनर्जी दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट म्हणून सिद्ध झाला होता. कल्ट क्लासिक म्हणून नावारूपास आलेल्या सिनेमाने त्यावेळी स्वतचा खास प्रेक्षकवर्ग तयार केला होता.
या सिनेमाने 54 व्या राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड जिंकला आहे.
या सिनेमाचा सिक्वेल बनणार असल्याची बातमी समोर येत आहे. या सिनेमात त्यावेळी अनुपम खेर, बोमन इराणी, विजय पाठक, रणवीर शौरी, तारा शर्मा हे कलाकार होते. या प्रोजेक्टच्या आतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले असून सध्या या सिनेमाचे कास्टिंग सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हुमा या सिनेमाचा मुख्य हिस्सा असणार आहे. हुमाला स्क्रिप्ट आवडली असून तिने या सिनेमाला होकार कळवला असल्याचे समोर येत आहे. याशिवाय हुमा जॉली एलएलबी 3 आणि महाराणीच्या चौथ्या सीझनमध्येही दिसणार आहे. याशिवाय टॉक्सिक हा महत्वाचा सिनेमाही तिच्या हातात आहे.
या नोव्हेंबरपासून या सिनेमाच्या कामाला सुरुवात होते आहे. हा सिनेमा 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
खोसला का घोंसलाच्या पहिल्या सीझनमध्ये कमल खोसला (अनुपम खेर ) यांची जमीन खुराना (बोमन इराणी ) नावाचा ठग हडपतो. आता या खोसलाच्या जमिनीचे नक्की काय होते यावर हा डार्क कॉमेडी जॉनरचा सिनेमा बेतला आहे.