

ALTT, Ullu या सारख्या 25 अॅपवर बॅन लावल्यानंतर एकता कपूरचे स्टेटमेंट समोर आले आहे. अलीकडेच भारत सरकारने व्हल्गर कंटेट बनवणाऱ्या अॅपवर बंदी आणली आहे. यामध्ये एक नाव ALTT हे देखील होते. या प्लॅटफॉर्मचे पहिले नाव ALT Balaji हे होते. ज्याची को फाऊंडर टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर या होत्या. (Latest Entertainment News)
आता ALTT चे नाव चर्चेत असताना एकताच्या बालाजी टेलिफिल्म्सकडून एक पोस्ट जाहीर करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये एकता लिहिते 'बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड, जी BSE आणि NSE च्या यादीत असलेली एक व्यावसायिक मीडिया कंपनी आहे, तिने नुकत्याच ALT डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटेड (जी पूर्वी तिची पूर्ण मालकीची उपकंपनी होती) सोबत झालेल्या विलीनीकरणानंतर 20 जून 2025 पासून ALTT चे कामकाज हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत की ALTT ला सरकारने बंद केले आहे. मात्र, याच्या उलट, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडने स्पष्ट केले आहे की एकता कपूर आणि शोभा कपूर यांचा ALTT सोबत आता कोणताही संबंध नाही. त्या दोघी जून 2021 मध्येच ALTT मधून बाहेर पडल्या आहेत. जर कोणी याच्या उलट कोणताही दावा करत असेल, तर तो चुकीचा आहे. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड माध्यमांना विनंती करते की, त्यांनी योग्य आणि अचूक माहितीच प्रसारित करावी. कंपनी सर्व लागू कायद्यांचे पूर्णपणे पालन करते आणि उच्च कॉर्पोरेट नियमांनुसार आपले कामकाज चालवते. ‘
सरकारच्या या निर्णयाचे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) ने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘अश्लीलता रोखण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोणत्या कलमानुसार हे अॅप बॅन आहे. कलम 67 : हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील कंटेट प्रकाशित किंवा प्रसारित करणे कलम 67A: इंटरनेटवर अश्लील कंटेट पोस्ट करणे कलम 294: : सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती किंवा शब्दाचा वापर करणे कलम 4 : महिलांचे अपमानकारक किंवा अश्लील पद्धतीने प्रदर्शन करणे कोणत्या कोणत्या अॅपचा आहे समावेश ALTT (पूर्वीचे ALTBalaji, ULLU, बिग शॉटस अॅप, देसीफ्लिक्स, बूम एक्स, नवरसा लाइट, गुलाब ॲप, कंगण ॲप, बुल ॲप, जलवा ॲप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राईम, फेनिओ, शो एक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉट एक्स व्हीआयपी, हलचल ॲप, मूड एक्स, निऑन एक्स व्हीआयपी, शो हिट, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रिफ्लिक्स
कलम 67 : हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील कंटेट प्रकाशित किंवा प्रसारित करणे
कलम 67A: इंटरनेटवर अश्लील कंटेट पोस्ट करणे
कलम 294: : सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती किंवा शब्दाचा वापर करणे
कलम 4 : महिलांचे अपमानकारक किंवा अश्लील पद्धतीने प्रदर्शन करणे
ALTT (पूर्वीचे ALTBalaji, ULLU, बिग शॉटस अॅप, देसीफ्लिक्स, बूम एक्स, नवरसा लाइट, गुलाब ॲप, कंगण ॲप, बुल ॲप, जलवा ॲप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राईम, फेनिओ, शो एक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉट एक्स व्हीआयपी, हलचल ॲप, मूड एक्स, निऑन एक्स व्हीआयपी, शो हिट, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रिफ्लिक्स