

अभिनेता, कॉमेडीयन कपिल शर्माच्या कॅनडा, सरे येथील कॅप्स कॅफेवर पुन्हा अंधाधुंद गोळीबार झाला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत हल्लेखोराने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मुंबई पोलिस आणि इतर सुरक्षा एजेंसी या घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. (Latest Entertainment NewS)
सोशल मिडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची माहिती समोर आली आहे. एक व्हीडियो दिसतो आहे ज्यात फायरिंगचा आवाज ऐकू येतो आहे. या नऊ सेकंदाच्या व्हीडियोत कपिलच्या कॅफेवर अनेक राऊंड फायर केले जात आहेत. या हल्ल्याची जबाबदारी गोल्डी ढील्लोंन आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी घेतली आहे.
सोशल मिडियावर लिहलेल्या पोस्टमध्ये हल्लेखोर म्हणतात, ‘ जय श्री राम, सत् श्री अकाल, सगळ्यांना राम राम. आज जी कपिल शर्माच्या कॅप्स कॅफे, सरे मध्ये फायरिंग झाली आहे. त्यांची जबाबदारी गोल्डी ढील्लोंन आणि लॉरेन्स बिश्नोई हे घेत आहेत. आम्ही याला फोन केला होता. याला रिंग ऐकू आली नाही त्यामुळे कारवाई केली. आताही रिंग ऐकू आली नाही तर लवकरच मुंबईत कारवाई करावी लागेल.’
या घटनेनंतर सरे पोलिस चौकशी करत आहेत. जवळपास 6 राऊंड याठिकाणी फायर केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
यापूर्वी अगदी अलीकडेच म्हणजे 11 जुलैला कपिलच्या कॅफेवर सगळ्यात पहिल्यांदा हल्ला झाला होता. त्यानंतर लगेचच हा हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 11 तारखेच्या हल्ल्यानंतर कपिल पुनः नवीन सुरुवात केली होती. तशा आशयाची पोस्टही त्याने इंस्टाग्रामवर लिहिली होती.
तेथील स्थानिक वेळेनुसार जुलैला रात्री 1.30 वाजता पोलिसांना हल्ला झाल्याची माहिती मिळाली. यावेळी कॅफेमध्ये बऱ्यापैकी स्टाफ होता. पण कोणतीही जीवित हानी झाली नव्हती.
दुसऱ्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांकडून कपिलला पोलिस प्रोटेक्शन दिले गेले आहे. पोलिस कपिलच्या बिल्डिंगचे सी सी टी व्ही फुटेज चेक करत आहेत.