

Ramayana Actor Yash First Look reveal from the set
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षित प्रोजेक्टपैकी एक असलेल्या रामायणमध्ये आता अॅक्शन, मायथोलॉजी आणि भव्यतेचा अफलातून संगम पाहायला मिळणार आहे. या भव्य सिनेमात रॉकिंग स्टार यश ‘रावण’च्या भूमिकेत झळकणार असून, त्यांचा पहिला लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रोजेक्टचे निर्माता आहेत दूरदृष्टी असलेले निर्माते नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे, यश या सिनेमात केवळ मुख्य भूमिकेत नाही, तर ते को-प्रोड्यूसर देखील आहेत. त्यांची निर्मितीसंस्था Monster Mind Creations आणि नमित मल्होत्रा यांची Prime Focus Studios मिळून हा सिनेमा साकारत आहेत.
यश सध्या या भव्य सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असून, हॉलीवूडचे दिग्गज अॅक्शन डायरेक्टर गाई नॉरिस यांच्यासोबत काम करत आहे. गाइ नॉरिस हे Mad Max: Fury Road यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत आणि आता ते रामायणसाठी उच्चस्तरीय अॅक्शन सीन डिझाईन करत आहेत.
सेटवरून नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये यश अतिशय फिट आणि युद्धासाठी सज्ज अशा लुकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा ट्रान्सफॉर्मेशन एक वेगळाच रावण समोर आणतो. या सिनेमाचे शूटिंग तीन भागांमध्ये होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होणार आहे. यश या पहिल्या भागासाठी सुमारे ६०ते ७० दिवसांचे शूटिंग करणार आहेत.
रामायण ही एक ऐतिहासिक कथा असून, ती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा उद्देश या प्रोजेक्टमागे आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि यश प्रमुख भूमिकेत असतील आणि त्यांच्यासोबत असेल वर्ल्ड-क्लास व्हिज्युअल इफेक्ट्स टीम, भव्य सेट्स आणि उत्तम दर्जाचे कलाकार. हा प्रोजेक्ट केवळ एक सिनेमा नसून, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक सिनेमॅटिक माइलस्टोन ठरणार आहे.