Kumbh Mela girl Monalisa | कुंभमेळा व्हायरल गर्ल मोनालिसाने मंदिरात जाऊन बांधली लग्नगाठ, पती आहे तरी कोण?

Kumbh Mela girl Monalisa | कुंभमेळा व्हायरल गर्ल मोनालिसाने मंदिरात जाऊन बांधली लग्नगाठ, पती आहे तरी कोण?
Kumbh Mela girl Monalisa
Kumbh Mela girl Monalisa marriage pudhari photo
Published on
Updated on
Summary

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली मोनालिसा पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार तिने मंदिरात जाऊन लग्न केल्याची चर्चा आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या पतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Kumbh Mela girl Monalisa got marriage

प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान व्हायरल झालेली आणि "कुंभमेळ्याची गर्ल" म्हणून ओळखली जाणारी तरुणी मोनालिसा भोसलेने मंदिरात जाऊन लग्नगाठ बांधली. रिपोर्टनुसार, तिच्या कुटुंबीयांचा यासाठी विरोध होता. आता तिने पोलिसांकडे संरक्षणासाठी मदत मागितली आहे.

केरळमधील तिचा जोडीदार फरमान खानशी लग्न केले आहे. ती घरात कुणालाही कल्पना न देता गायब झाली. साऊथच्या या मुस्लिम तरुणाशी पारंपरिक पद्धतीने मंदिरात जाऊन लग्न केले.

तिरुवनंतपुरममधील नैनार मंदिरात या जोडप्याने लग्न केले. यावेळी काही लोकांची गर्दी आजुबाजूला पाहायला मिळाली. मोनालिसाने लग्नापूर्वी केरळच्या राजधानीतील थंपनूर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती की तिचे कुटुंब तिचे नाते स्वीकारत नाही आणि तिचे वडील तिच्या इच्छेविरुद्ध तिला त्यांच्या गावी परत नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Kumbh Mela girl Monalisa
Sai Pallavi-Junaid Khan Ek Din Trailer | साई पल्लवी-जुनैद खानची क्यूट लव्ह स्टोरी, ट्रेलरसह रिलीज डेट जाहीर

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोनालिसा आणि फरमान राज्यात काम करणाऱ्या चित्रपटाच्या क्रूच्या सदस्यांसह स्टेशनवर पोहोचले. तिने अधिकाऱ्यांना सांगितले की, ती तिच्या जोडीदारासोबत राहून त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे. तिने तिच्या वडिलांसोबत जाणार नाही असा आग्रह धरला आणि तिने स्पष्ट केले की ती तिच्या प्रियकराशी लग्न करणार आहे. ती प्रौढ असल्याने, ती तिच्या मर्जीनुसार वागू शकते, असे एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही व्यक्ती प्रौढ असल्याने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. पोलिस स्टेशनमध्ये चर्चा केल्यानंतर, मोनालिसा तिच्या प्रियकर आणि चित्रपटातील क्रूच्या सदस्यांसह निघून गेली. तिचे वडील नंतर त्यांच्या गावी परतले.

मोनालिसाने माध्यमांना सांगितले की, लग्नानंतर ती आनंदी आहे आणि स्पष्ट केले की, या जोडप्याने केरळ हे ठिकाण निवडले. कारण त्यांना हे राज्य आवडले. यावेळी फरमान खान म्हणाला- "आमची प्रेमकथा सहा महिन्यांची आहे. मी देखील एक कलाकार आहे."

Kumbh Mela girl Monalisa
New Marathi Film Mission Mumbai | अभिनेते विजय पाटकर घेऊन येताहेत नवा चित्रपट 'मिशन मुंबई', थ्रीलर कहाणी वाढणार धाकधूक!

महाकुंभ मेळा २०२५ मधील व्हिडिओ, फोटोमुळे मोनालिसा व्हायरल झाली होती. लाखों भक्तांमध्ये तिचे सौंदर्य आणि अनोखा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, मोनालिसाला चित्रपटात संधी देणारे दिग्दर्शक सनोज मिश्राने या लग्नाबद्दल गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय-मोनालिसाला फसवण्यात आलं आहे. हे लव-जिहादचे प्रकरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news