

साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या ‘एक दिन’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दोघांची गोड आणि भावनिक प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. ट्रेलरसह चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Ek Din Trailer Trailer Out Now!
बॉलिवूडमधील आगामी चित्रपट ‘एक दिन’ सध्या चर्चेत आला आहे. जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्या "एक दिन" या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात Sai Pallavi आणि Junaid Khan यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘एक दिन’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक क्यूट लव्हस्टोरी पाहायला मिळते.
साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या भूमिकांमधील केमिस्ट्री ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये दोघांची पहिली भेट, त्यांच्या नात्यातील गोड क्षण आणि त्यानंतर येणारे काही भावनिक प्रसंग याची झलक दाखवण्यात आली आहे.
आमिर खान प्रॉडक्शनचा हा चित्रपट असेल. या चित्रपटातून साऊथ अभिनेत्री साई पल्लवी डेबयू करत आहे. तर आमीर खानचा मुलगा जुनैद देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
ट्रेलरमध्ये काय?
ट्रेलरची सुरुवात एका शांततेने सुरु होते. जुनैद खान 'फॉर्च्यून बेल' (भाग्याची घंटा) बद्दल बोलताना दिसतो, जी वाजल्यावर खऱ्या प्रेमाची इच्छा पूर्ण करते. हे सांगताना तो साई पल्लवी (मीरा) कडे पाहतो आणि शांतपणे प्रार्थना करतो की, ती त्याची व्हावी. तो म्हणतो की, त्याची इच्छा पूर्ण व्हावी, जरी फक्त एका दिवसासाठी असली तरी. ट्रेलरमध्ये जुनैद आणि साई पल्लवी यांच्यातील गोड केमिस्ट्री दाखवली आहे.
जुनैदच्या भूमिकेत निरागसता आणि साधेपणा दिसतो. साई पल्लवी आत्मविश्वासू आणि शांत दिसते. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील टायटल सॉन्ग सर्वांच्याच पसंतीस उतरले होते. त्यावेळी साई पल्लवीची जोरदार चर्चा देखील झाली होती. अरिजीत सिंगच्या आवाजाने ते गाणे संगीतप्रेमींना आणखी भावले होते. साई पल्लवीचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. ट्रेलरमध्येही साई पल्लवीची भूमिका खूप छान असली तरी चित्रपट रिलीज झाल्यानंतर समजू शकणार आहे की, तिच्या अभिनयाला किती प्रतिसाद मिळतो.