New Marathi Film Mission Mumbai | अभिनेते विजय पाटकर घेऊन येताहेत नवा चित्रपट 'मिशन मुंबई', थ्रीलर कहाणी वाढणार धाकधूक!

New Marathi Film Mission Mumbai | “मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
New Marathi Film Mission Mumbai
New Marathi Film Mission Mumbai poster released instagram
Published on
Updated on
Summary

अभिनेते विजय पाटकर ‘मिशन मुंबई’ या नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. थरार आणि रहस्याने भरलेली ही कथा असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे.

अभिनेते विजय पाटकर यांच्या “मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सोशल मीडियावर या पोस्टरची चर्चा होताना दिसतेय. हा एक ॲक्शन चित्रपट असेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचे मुंबईत प्रदर्शित करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पोस्टर अनावरण सोहळ्याला कलाकार, चित्रपटाची टीम, मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटवर तसेच मुंबईत आलेल्या आरडीएक्सवर आधारीत हा चित्रपट आहे. मिशन मुंबईमध्ये अनेक ॲक्शन दृश्ये आहेत. या चित्रपटात मुख्य कलाकार आनंद जोग, विजय पाटकर यांच्यासमवेत अजॉय शर्मा हे आहेत. चंद्रकांत विसपुते आणि कैलास पवार यांनी दिग्दर्शन केले असून कथा चंद्रकांत विसपुते यांची आहे.

“मिशन मुंबई” चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा असून विजय पाटकर, आनंद जोग, सुरेखा कुडची हे कलाकार प्रमुख भूमिकेत असतील, शिवाय ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत, सिद्धेश आचरेकर शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण हे कलाकार देखील या चित्रपटात असणार आहेत.

New Marathi Film Mission Mumbai
New Marathi movie | प्रार्थना बेहरे, पूजा सावंत, अभिजीत खांडकेकरच्या मैत्रीचा सुंदर प्रवास; ‘सखे गं साजणी’ टीझर पाहाच

चित्रपट पोस्टर अनावरण सोहळ्याला अभिनेता अजॉय शर्मा, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण, फाईट मास्टर फय्याज सय्यद शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, तसेच दिग्दर्शक कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते, दिग्दर्शक शिरीष राणे यांची उपस्थिती होती.

New Marathi Film Mission Mumbai
Govinda-Sunita Divorce rumors| 'मागील २ वर्षे कठीण काळ..घरात अशांती.. ' गोविंदाच्या मुलीने सांगितले सत्य काय?

रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत ‘मिशन मुंबई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. चित्रपटाची कथा चंद्रकांत विसपुते यांची असून पटकथा व संवाद मच्छिंद्र कदम यांचे आहेत. छायाचित्रण नंदलाल चौधरी यांचे असून मेकअप किशोरजी पिंगळे हे करत आहेत. संगीताची धुरा समीर खोले सांभाळत असून फाइट मास्तर फय्याज सय्यद हे फाइटिंग एक्शनचा भाग करत आहेत. मिशन मुंबई चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news