Hrithik Roshan triple role in Krrish 4
ग्रीक गॉड हृतिक रोशनचा आगामी सिनेमा कधी येणार याची वाट चाहते पाहत असतात. वॉर 2 नंतर हृतिक पुन्हा एकदा अॅक्शन मोड मध्ये दिसणार आहे. त्याचे चाहते हृतिकचा सुपरहिरो युनिव्हर्स मधील आगामी सिनेमा म्हणजेच क्रिशची आवर्जून वाट पाहत आहेत.
या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार असल्याच्या चर्चेने चाहते उत्साहित आहेत. पण प्रेक्षकांच्या आनंदात भर घालण्यासाठी अजून एक गुड न्यूज आम्ही तुम्हाला देत आहोत. या सिनेमात प्रीती झिंटा आणि रेखा यांचीही वापसी होणार आहे.
या सिनेमात हृतिकचा ट्रिपल रोल असल्याचेही समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका मोठ्या व्हिलनविरोधात उभे राहण्यासाठी क्रिशला वेगळ्या मितीत, वेगळ्या प्रमाणकाळात दिसणे आवश्यक आहे. त्यासाठी या सिनेमात हृतिकचा ट्रिपल रोल असल्याचे समोर येते आहे.
या सिनेमात व्हीएफएक्स आणि तगडी अॅक्शन असणार आहेच याशिवाय या सिनेमात भावना, कुटुंब आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारी ठरेल.
क्रिश युनिव्हर्समधल्या इतर सिनेमांपैकी हा सिनेमा अधिक अॅक्शनपॅक्ड आणि व्हीएफएक्सची भरपूर रेलचेल असलेला सिनेमा असणार आहे. पण मेकर्स या सिनेमाला टाइम ट्रॅवलशी जोडून त्याची रंजकता वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर येत आहे. बॉलीवूडमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.
वायआरएफ स्टुडियोमध्ये या सिनेमाच्या प्री प्रोडक्शनचे काम सुरू आहे. हृतिक, आदित्य चोप्रा आणि व्हीएफएक्स टीम या सिनेमाच्या पटकथेवर काम करत असल्याचे समोर आले आहे. 2026 पर्यंत हा सिनेमा फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे.
कोई मिल गया सिनेमाचा चार्म असलेला जादूही या सिनेमात दिसणार असल्याचे समोर येत आहे. 23 वर्षांनी जादू या सिनेमात काय जादू करतो हे पाहणे रंजक ठरेल.
चीनी गायक जॅकसन व्यंग या सिनेमाचा भाग असल्याचे समोर येत होते. पण वांगने स्वत हा दावा फेटाळून लावला होता. त्याने ही गोष्ट फेक असल्याचे सांगितले होते. तसेच अभिनयाचा आणि माझा काही संबंध नसल्याचेही त्याने यावेळी बोलून दाखवले होते.
या सिनेमाच्या निमित्ताने प्रीतीही बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.