

मुंबई - अभिनेता प्रियदर्शन जाधव मराठी चित्रपटसृष्टीत हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखला जातो. तो केवळ अभिनेताच नाही तर विनोदी कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकही आहे. अभिनयासोबतच तो समाजातील विविध विषयांवरही स्पष्ट आणि परखड मत मांडतो. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शनने लाईमलाईट, प्रसिद्धी आणि करिअर याबाबत आपली मते मांडली. या बातचीतमधून त्याने आपले अनुभव कथन केले. त्याने नाव न घेता त्याच्या मित्राबद्दल सांगितले. लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी लोक काय काय करतात? कधी कधी टीकेचे धनीही हहोतात. पण शेवटी प्रोफेशन आहे. लाईमलाईटमध्ये राहण्यात काहीही चुकीचं नाही, असे म्हणत त्याने आपला संवाद साधला आहे.
प्रियदर्शन म्हणतो की, लाईमलाईटमध्ये राहण्याची इच्छा चुकीची नाही. उलट, प्रत्येक कलाकाराला आपल्या कलेसाठी ओळख मिळावी, प्रकाशझोतात यावं असं वाटणं साहजिकच आहे. त्याने एक उदाहरण देत सांगितलं की, ''लाईमलाईटमध्ये राहण्याची इच्छा चुकीची नाही. माझा एक मित्र आहे, तो लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी तो वाट्टेल ते करतो. लाईमलाईटमध्ये टिकून राहण्यासाठी तो विविध डायनॅमिकनी तो स्वत:च्या करिअरकडे बघतो आणि त्याचा पुरेपुर वापर करतो. यात मला काहीही चुकीचं नाही वाटत. पम चित्रीत असं केलं जातं की, अरे हा स्वत:ची किती लाल करतो. लोक त्यावर बोलतात. पण सकारात्मक दृष्टीने आम्ही घेतो. पण ठिक आहे तो व्यवसायाचा एक भाग आहे. success comes with its baggage असं म्हटलं जातं. ती बॅग खाली ठेवली की सक्सेस सुटलं. बॅग खांद्यावर घेऊनच जावं लागणार आहे.''
पण, त्याने नेमकं कोणत्या कलाकाराबद्दल सांगितले आहे, हे समजू शकलेले नाही. त्याने त्याच्या मित्राचे नाव न घेता या गोष्टी संवादात सांगितल्या. प्रियदर्शनचा रोख नेमका कुणाकडे आहे, हा कुतुहलाचा विषय म्हणता येईल.
म्हणजेच यशाबरोबरच काही जबाबदाऱ्या, मानसिक दडपणं, सतत काहीतरी सिद्ध करण्याची गरज ही असतेच. त्याचा आणखी खोल अर्थ सांगताना तो म्हणतो, "ती बॅग खाली ठेवली की सक्सेस सुटलं. ती बॅग खांद्यावर घेऊनच पुढे जावं लागतं." म्हणजेच यश टिकवून ठेवायचं असेल, तर त्याबरोबर येणाऱ्या ताण, अपेक्षा आणि जबाबदाऱ्याही पेलाव्या लागतात.
प्रियदर्शन जाधवचा जन्म २९ एप्रिल, १९८० मध्ये कोल्हापुरात झाला. रवि जाधव यांच्या टाईमपास-२ (२०१५) मध्ये दगडू ही भूमिका त्याने साकारली होती. प्रियदर्शनने २०१३ मध्ये 'चिंटू २' आणि २०१२ मध्ये 'विजय असो' या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. २०१० मध्ये 'हापूस' या चित्रपटासाठी तो सहदिग्दर्शक होता.