Kritika and Gaurav Wedding: कृतिका आणि गौरव कपूर विवाहबंधनात अडकले; नेहरा, युवराज, सेहवागच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Kritika Kamra and Gaurav Kapur's Wedding: अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध होस्ट गौरव कपूर यांनी मुंबईत लग्न केले. या विवाहसोहळ्याला युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग, नेहा धूपिया आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते.
Kritika Kamra and Gaurav Kapur's Wedding Video
Kritika Kamra and Gaurav Kapur's Wedding VideoPudhari
Published on
Updated on

Kritika Kamra and Gaurav Kapur's Wedding Video: टीव्ही आणि मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट व स्पोर्ट्स प्रेझेंटर गौरव कपूर हे विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी मुंबईतील बांद्रा येथील आपल्या निवासस्थानी लग्न केले. कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कृतिका आणि गौरव यांनी रजिस्टर मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा विवाह समारंभ अतिशय साधेपणाने पार पडला. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याने मित्रांसाठी एक छोटेखानी सेलिब्रेशन आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

या लग्नसमारंभाला क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, पत्नी हेझल कीच आणि मुलांसह या समारंभाला उपस्थित होता. संपूर्ण कुटुंब पारंपरिक पोशाखात दिसत होते. कार्यक्रमात माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा आणि झहीर खान देखील सहभागी झाला होता. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक फरहान अख्तरही यावेळी उपस्थित होता.

त्याचप्रमाणे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग देखील या लग्नात सहभागी झाला होता. या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध चेहरेही दिसले. अभिनेत्री नेहा धूपिया आणि अभिनेता अंगद बेदी, तसेच अमृता अरोरा आणि शकील लडक यांसारख्या सेलिब्रिटी जोडप्यांनी या आनंदसोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले.

Kritika Kamra and Gaurav Kapur's Wedding Video
Sai Pallavi-Junaid Khan Ek Din Trailer | साई पल्लवी-जुनैद खानची क्यूट लव्ह स्टोरी, ट्रेलरसह रिलीज डेट जाहीर

दरम्यान, या सेलिब्रेशनदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि इतर मित्र नवविवाहित जोडप्यासोबत नाचत असल्याचे दिसत आहे.

कृतिका कामरा कोण आहे?

अभिनेत्री कृतिका कामरा ही टीव्ही आणि मनोरंजनविश्वात लोकप्रिय आहे. तिने ‘कितनी मोहब्बत है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ आणि ‘रिपोर्टर्स’ या मालिकांमधून मोठी लोकप्रियता मिळवली. याशिवाय तिने ‘भीड़’, ‘तांडव’, ‘मित्रों’ आणि ‘बंबई मेरी जान’ यांसारख्या चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्टमध्येही काम केले आहे.

Kritika Kamra and Gaurav Kapur's Wedding Video
New Marathi movie | प्रार्थना बेहरे, पूजा सावंत, अभिजीत खांडकेकरच्या मैत्रीचा सुंदर प्रवास; ‘सखे गं साजणी’ टीझर पाहाच

दुसरीकडे, गौरव कपूर हा भारतातील एक प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. त्याचा यूट्यूबवरील लोकप्रिय टॉक शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ खूप चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटू आणि खेळाडूंशी संवाद साधला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news