

Konkona Sen-Amol Parashar Dating Rumors spot together
मुंबई : कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु असताना दोघे पुन्हा एकत्र दिसले. वेब सीरीज ग्राम चिकित्सालयाच्या स्क्रिनिंगवेळी दोघे एकत्र होते. मध्यंतरी एका मुलाखतीत अमोलने नात्यात असल्याची कबुली दिली होती. मात्र, त्याने कोंकणाचे नाव घेणं टाळले होते. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या डॉली, किट्टी और वो चमकते सितारे या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते.
गेल्या काही महिन्यांपासून कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पराशर यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा सोशल मीडिया आणि बॉलिवूडच्या वर्तुळात रंगल्या होत्या. यात भर म्हणजे एका मुलाखतीत अमोलने सीरियस रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले. सध्या मला नातं जगासमोर आणायची गरज नाही असे त्याने सांगितले होते. बुधवारी खार येथे 'ग्रामचिकित्सालय' या वेबसीरिजच्या प्रीमियरला दोघंही एकत्र दिसले आणि या चर्चेला दुजोराच मिळाला. कोंकणा आणि अमोल कॅमेऱ्यासमोर स्मितहास्य करताना दिसले.
कोण आहे अमोल पराशर?
अमोल हा दिल्ली आयआयटीचा विद्यार्थी असून अभिनयात करिअर करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो सिनेसृष्टीकडे वळला. टीव्हीएफच्या सुपरहिट 'चितवन शर्मा' या सीरिजमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. अमोल पराशरने 2009 मध्ये 'रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द ईयर' या हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
कोंकणाचा झाला होता घटस्फोट
कोंकणा सेन- शर्माने रणवीर शौरीशी लग्न केले होते. 2015 मध्ये ते विभक्त झाले होते. 2020 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट केले होते. कोंकणा आता 45 वर्षांची असून अमोल पराशर हा 38 वर्षांचा आहे.
प्राईम व्हिडीओने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवी कहाणी ‘ग्राम चिकित्सालय’ समोर आणली आहे. दिग्दर्शक राहुल पांडे यांची ही सिरीज ग्रामीण भारताच्या हृदयाला भिडणारी कथा आहे, जी वास्तव आणि विनोदाचा अनोखा संगम घडवते. या कथेमध्ये ग्रामीण आरोग्य सेवा व्यवस्थेतील तुटफूट, मानसिक आरोग्यविषयी जागरूकता आणि शहरी व ग्रामीण संघर्षामधील फरक अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले आहेत.
उत्तर भारतातील काल्पनिक गाव ‘भटकंडी’ या पार्श्वभूमीवर आधारित ही सीरीज आहे. एका मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटनांवर केंद्रित आहे. यातून ग्रामीण जीवनातील कठोर, अनोळखी वास्तवाची झलक दिसते.
ही सिरीज आपल्याला ‘स्वदेस’ची आठवण करून देणारी एक भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची कथा सांगते. डॉ. प्रभात सिन्हा (अमोल पाराशर) हा एक आदर्शवादी तरुण डॉक्टर, वडिलांच्या शहरातील यशस्वी रुग्णालयाचा मार्ग सोडून, एका मोडकळीस आलेले ग्रामीण रुग्णालय पुन्हा उभं करण्याच्या मिशनवर निघतो.