Amaira Trailer | भावनांनी व्यापलेल्या नात्यांची उत्कट कहाणी असणारा ‘अमायरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Amaira Trailer | ‘अमायरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे
image of Amaira poster
Amaira Trailer released Instagram
Published on
Updated on

Amaira Marathi movie Trailer released

मुंबई - नात्यांचे गुंतागुंतीचे रंग उलगडणारा, विविध भावनांना स्पर्श करणारा आणि नात्यांच्या शोधात असलेल्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारा मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा' या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलर मध्ये नात्यांतील प्रेम, दुरावा, समज-गैरसमज आणि एकमेकांना समजून घेण्याचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर अमायराच्या आयुष्यातील काही कठीण निर्णयांचे क्षण सुद्धा आपण पाहू शकतो. "अमायरा" केवळ एक कथा नाही, तर अनेकांच्या आयुष्यातील वास्तवाचा आरसा वाटतो. ट्रेलर शेवटी एक विचार देऊन जातो "कधी नातं शोधावं लागतं, आणि कधी स्वतःला…" जो मनात खोलवर घर करतो.

चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे लोकेश गुप्ते ह्यांनी, तर मुक्ता आर्टस्ने निर्मिती केली आहे. ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. चित्रपटात अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सगळ्यांनी चित्रपटात साकारलेली भावस्पर्शी पात्रं ही प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःची वाटू शकतात, एवढा या कथानकात गहिरा भावनिक प्रवास आहे.

image of Amaira poster
India-Pakistan Tension दरम्यान 'Lahore 1947' मध्ये बदल करण्याची तयारी? बैठकीत काय ठरणार?

चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत व छायाचित्रण हे देखील या चित्रपटाच्या आत्म्यातील महत्त्वाचे पैलू आहेत. नात्यांमधल्या सूक्ष्म भावना, गैरसमज, आत्मीयता आणि शोध यांचं सुरेख चित्रण म्हणजेच ‘अमायरा'.

image of Amaira poster
‘३ इडियट्स’, ‘पीके’नंतर Rajkumar Hirani-Aamir Khan पुन्हा एकत्र; आणताहेत 'हा' बायोपिक

"अमायरा" या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे आहेत तर लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तसेच सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल हे आहेत. "अमायरा" हा सिनेमा २३ मे २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

video - tips.marathi insta वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news