‘३ इडियट्स’, ‘पीके’नंतर Rajkumar Hirani-Aamir Khan पुन्हा एकत्र; आणताहेत 'हा' बायोपिक

Rajkumar Hirani-Aamir Khan | आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत
image of aamir khan and rajkumar hirani
Rajkumar Hirani-Aamir Khan will work together Instagram
Published on
Updated on

Rajkumar Hirani-Aamir Khan will work together

मुंबई : भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आता बायोपिक येणार आहे. या ऐतिहासिक प्रोजेक्टमागे अभिनेता आमिर खान आणि दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार आहेत. याआधी दोघांनी ‘३ इडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे अविस्मरणीय सिनेमे दिले आहेत.

भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या व्यक्तिमत्वाची कथा आजपर्यंत हिंदी सिनेमात साकारण्यात आली नव्हती, ही बाबच आश्चर्यकारक होती. मात्र आता ही सिनेमाच्या जन्माची कथा, सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी मांडणार आहे. ज्याने शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या स्थानिक चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली.

image of aamir khan and rajkumar hirani
Usha Nadkarni | 'डोक्यात मुंग्या यायच्या'.. उषा नाडकर्णींना कोणत्या शोमधून बाहेर पडल्यावर असं वाटत होतं?

या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. 'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शना नंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. चित्रपटासाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत.

image of aamir khan and rajkumar hirani
India-Pakistan Tension दरम्यान 'Lahore 1947' मध्ये बदल करण्याची तयारी? बैठकीत काय ठरणार?

या चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत, जे पटकथेसाठी अत्यंत मौल्यवान ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news