पुढारी ऑनलाईन डेस्क : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचे रिलेशनशीप सर्वश्रुत आहे. आता हे कपल लग्नबंधनात अडकतील, असा कयास लावला जात आहे. दरम्यान, २०२२ ची शेवटची संध्याकाळ विसरून २०२३ वर्षाचे स्वागत करण्यासाठी दोघांनी एकत्र पार्टी केली. (KL Rahul-Athiya) पार्टी केली खरी पण, आता दोघेही एका कारणावरून ट्रोल होत आहेत. केएलने त्याच्या ट्विटरवर पार्टीतील काही फोटोज शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोंवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरु केले. केएल राहुल त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीसोबत दुबईमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशन केले. यावेळी त्यांच्यासोबत काही मित्र देखील होते. (KL Rahul-Athiya)
व्हायरल झालेल्या फोटोजमध्ये दोघांनी आपल्या आपल्या मित्रांसोबत पार्टी केल्याचे दिसते. या पोस्टशिवाय, अथियानेदेखील मित्रांचे काही फोटो शेअर केले आहेत. शिवाय फोटो स्टोरी शेअर केलीय. या फोटोंमध्ये अथिया केएल राहुलसोबत वेगवेगळ्या पोझमध्ये दिसतेय. या पार्टीत लाल रंगाची लाईटदेखील दिसते.
या फोटोजवर आता फॅन्सकडून प्रतिक्रियादेखील येत आहेत. एका युजरने या फोटोंवर कमेंट करत लिहिलं, "सुपर जोडी" एका युजरने लिहिलं, "जगातील बेस्ट जोडी". एका अन्य युजरने लिहिलं, "तुम्ही दोघे खूप छान दिसत आहात." काही युजर्सनी या फोटोंवर फायर इमोजी शेअर केलीय.
दरम्यान, काही नेटकऱ्यांनी पार्टीचे फोटो पाहून के एल राहुलची शाळा घेतली. एका युजरने म्हटलंय-भावा, आता तू तुझ्या पत्नीसोबत राहा, क्रिकेटमध्ये परत येऊ नकोस, क्रिकेटमधून संन्यास घे आता. दुसऱ्या युजरने लिहिलं आहे-चार-पाच वर्षतर परत येऊ नकोस.
अथिया-राहुल एकमेकांना दीर्घकाळ डेट करत आहेत. एकमेकांविषयी ते सोशल मीडियावर पोस्ट करतानाही दिसतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे जानेवारी २०२३ मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. अथियाचे वडील अभिनेते सुनील शेट्टीने देखील 'धारावी बँक' च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात पुष्टी केली होती की, दोघांचे लग्न लवकरचं होईल. पण, त्यांनी तारखेचा खुलासा केलेला नव्हता.