The Kerala Story 2: ‘द केरळ स्टोरी 2’ च्या प्रदर्शनाला ब्रेक; कोर्टाचा सेन्सॉरला झटका, नेमकं काय घडलं?

The Kerala Story 2 Release Stay: केरळ उच्च न्यायालयाने The Kerala Story 2 च्या प्रदर्शनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र देताना नियमांचे पालन झाले का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
The Kerala Story 2 Release Stay
The Kerala Story 2 Release StayPudhari
Published on
Updated on

The Kerala Story 2 Release Stay: केरळ उच्च न्यायालयाने ‘द केरळ स्टोरी 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. 27 फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित न करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी सुनावणीदरम्यान सेन्सॉर बोर्डावरही प्रश्न उपस्थित केले. “नियमांचे पालन झाले का?” असा सवाल करत न्यायालयाने प्रमाणपत्र देताना विचार केला गेला नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या आक्षेपांमध्ये काही मुद्दे प्रथमदर्शनी गांभीर्याने पाहण्यासारखे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

The Kerala Story 2 Release Stay
Shraddha Kapoor Kolhapur |'ईठा'चे शूटिंग, श्रद्धा कपूर अंबाबाईच्या चरणी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

ही याचिका जीवशास्त्रज्ञ श्रीदेव नंबूदिरी यांनी दाखल केली होती. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे केरळ राज्याची प्रतिमा अत्यंत नकारात्मक पद्धतीने दाखवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या चित्रपटातील कथानकात तरुण हिंदू महिलांना आंतरधर्मीय विवाहाच्या नावाखाली फसवले जाते, त्यांच्यावर अत्याचार होतात आणि जबरदस्ती धर्मांतर केले जाते, असा दावा करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच या आशयावरून वाद वाढू लागला होता.

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन कमाख्या नारायण सिंह यांनी केले असून निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाविरोधात निर्माते अपील दाखल करण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाचे नियोजित प्रदर्शन जवळ आल्याने निर्माते तातडीने आदेशाची सविस्तर प्रत मिळवून आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

The Kerala Story 2 Release Stay
Film Bhooth Bangla | 'अब मजा आएगा ना भिडू' 'भूत बंगला'चे मोशन पोस्टर पाहून नेटकऱ्यांना आठवला 'भूल भुलैय्या', म्हणाले...

या प्रकरणात न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) आणि चित्रपट निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news