Kerala Story 2 row | 'केरळ स्टोरी-२'चा टीझर रद्द? हायकोर्टात चित्रपट दाखवण्यास निर्माते तयार नाहीत

Kerala Story 2 row | 'केरळ स्टोरी-२'चा टीझर रद्द? हायकोर्टात चित्रपट दाखवण्यास निर्माते तयार नाहीत
Kerala Story 2 film poster
Kerala Story 2 film updates
Published on
Updated on
Summary

‘केरळ स्टोरी २’चा टीझर रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, हायकोर्टात चित्रपट दाखवण्यास निर्माते तयार नाहीत.

Kerala Story 2 row updates

वादग्रस्त ठरलेल्या The Kerala Story या चित्रपटाबाबत पुढील अपडेट आलीय. ‘केरळ स्टोरी २’चा टीझर अचानक रद्द करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. हायकोर्टात चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यास निर्माते तयार नाहीत.

पहिल्या भागाने देशभरात मोठी चर्चा आणि वाद निर्माण केला होता. दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि निर्माता विपुल शाह (Vipul Amrutlal Shah) यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, मात्र त्याचवेळी अनेक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी चित्रपटाच्या आशयावर आक्षेप घेतला होता. काही राज्यांमध्ये चित्रपटावर बंदीची मागणीही झाली होती. आता ‘केरळ स्टोरी २’चा टीझर रिलीज हटवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

केरळ स्टोरी २ हा चित्रपट २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. केरळ उच्च हायकोर्टाने मंगळवारी द केरळ स्टोरी २ च्या निर्मात्यांना शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यापूर्वी कोची येथील कोर्टात स्क्रिनिंगचे आयोजन करण्याचे आदेश दिले. पण नंतर, निर्मात्यांनी सांगितले की, ते हायकोर्टात चित्रपट दाखवण्यास तयार नाहीत. त्यानंतर कोर्टाने सुनावणीसाठी हा विषय पुढे ढकलला.

Kerala Story 2 film poster
Hardik Pandya gifts son car | हार्दिकचं पुत्र प्रेम! अगस्त्यला गिफ्ट केली तब्बल ४ कोटींची कार! एक्स वाईफ नताशाची अशी प्रतिक्रिया

२०२३ मध्ये मुळचा चित्रपट केरळ स्टोरीचा हा आता रिलीज होणारा चित्रपट सीक्वेल आहे. हिंदू महिलांना जबरदस्तीने धर्मांतरण करण्याच्या कथेवरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत असून काही जणांनी निर्मात्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी पारदर्शकतेचा अभाव असल्याची टीका केली आहे.

Kerala Story 2 film poster
Shraddha Kapoor Kolhapur |'ईठा'चे शूटिंग, श्रद्धा कपूर अंबाबाईच्या चरणी, चाहत्यांची प्रचंड गर्दी

कोर्टाच्या आदेशानंतर केरळ स्टोरी २ च्या निर्मात्यांनी मेकर्स दावा केला की, हा चित्रपट "सत्य घटना आणि कहाणी"वर आधारित आहे. आणि चित्रपटाचा टीझर मागे घेत असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाची रिलीज तारीख, टीझर रद्द करण्यामागील नेमके कारण आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

द केरळ स्टोरी २ बद्दल थोडेसे..
केरळ, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये घडणाऱ्या जबरदस्तीच्या धर्मांतर विषयांवर आधारित हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. द केरळ स्टोरी २ ला CBFC कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, अदिती भाटिया या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news