

सुपरस्टार थलापथी विजय यांनी त्यांच्या राजकीय पक्ष TVK मार्फत २०२६ तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उमेदवार म्हणून उमेदवारी स्वीकारली आहे. त्याचवेळी त्यांच्या आगामी चित्रपट “जन नायकन” चा नवीन लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
Jana Nayagan New Poster Out
मुंबई : थलपति विजयचा चित्रपट 'जन नायकन'च्या निर्मात्यांनी पोंगलच्या निमित्ताने एक नवे पोस्टर जारी केले आहे. ९ जानेवारी रोजी रिलीजच्या पहिल्या प्रचारासोबतच हे एक नवे पोस्टर जारी करण्यात आले असून ट्टविटरवर व्हायरल होत आहे. तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) द्वारा २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी विजयच्या मुख्यमंत्री उमेदवारीची अधिकृत घोषणाही करण्यात आलीय.
पोस्टरमध्ये ही आहे खासियत
थलपति विजयचा आगामी चित्रपट 'जन नायकन'चे एक नवे पोस्टर निर्मात्यांनी एक्स अकाऊंटवर जारी केलं आणि लिहिलं-'चला सुरूवात करुया.' यामध्ये विजयला जनतेच्या नेत्याच्या रूपात दाखवण्यात आलंय. निळा शर्ट-एविएटर चश्मा घालून गर्दीत उभा असलेला तो दिसतो आहे. 'जन नायकन' ९ जानेवारी रोजी पोंगल/मंगल संक्रांतीच्या निमित्ताने रिलीज होईल.
हा चित्रपट विजय राजकारणात उतरण्यापूर्वीचा अखेरचा चित्रपट मानला जात आहे. पोंगलचा उत्सव दक्षिण भारतात प्रेक्षकांसाठी खूप खास असतो. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.
एच विनोथ यांचे दिग्दर्शन असून चित्रपटात बॉबी देओल आणि पूजा हेगडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती केवीएन प्रोडक्शन्सने केलीय.
विजयच्या ५१ व्या जन्मदिनी केवीएन प्रोडक्शनने यूट्यूबवर चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. क्लिपमध्ये विजय एका दाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.