

आई झाल्यानंतर कॅटरीना कैफची पहिली झलक चाहत्यांसमोर आली असून विक्की कौशलने ख्रिसमस सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत. साध्या पण आनंदी क्षणांनी भरलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कॅटरीना कैफ आणि विक्की कौशल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे कॅटरीनाची आई झाल्यानंतरची पहिली झलक आणि विक्कीने साजरा केलेला खास ख्रिसमस. विक्की कौशलने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
ख्रिसमसच्या आनंदी वातावरणात विक्की-कॅटरीनाने हा सण कुटुंबासोबत साजरा केला. शेअर केलेल्या फोटोंमध्ये कॅटरीना सिंपल पण हॅप्पी दिसते. फार गाजावाजा न करता, शांत आणि खासगी पद्धतीने साजरा केलेल्या या ख्रिसमस फोटोवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.
बॉलिवूड दीवा कॅटरिना सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती सध्या लाईमलाईटपासून दूर असली तरी तिने आपली पहिली झलक शेअर केली आहे. निमित्त होतं- ख्रिसमसचे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. कॅटरिना पहिल्यांदाच आई झाली आहे. तिने आपल्या बाळासोबत पहिला ख्रिसमस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कैफ आणि कौशल फॅमिली एकत्र आलेली दिसली. अभिनेत्रीने तिच्या घरातील एक झलक शेअर केली आहे.
तब्बल दीड महिन्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिची पहिली पोस्ट पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये ते ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. त्यांचे कुटूंब एकत्र दिसते. फॅमिली फोटोमध्ये कॅटरिना, तिचा भाऊ, पती विकी कौशल, सनी कौशल या फोटोत दिसत आहेत.
सर्वजण कॅज्युअल ड्रेसमध्ये आहेत आणि कॅटरिना वगळता, सर्वांनी सांता कॅप घातलेली दिसते. नो-मेकअप आणि लाल ड्रेसमध्ये तिच्या चेहऱ्यावर मॉम ग्लो स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना कॅटरिना कैफने कॅप्शनमध्ये लिहिले की, "सर्वांसाठी प्रेम, आनंद आणि शांती... तुमचा नाताळ चांगला जावो."