

बांग्लादेशातील हिंसाचार आणि मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर जान्हवी कपूरने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना ‘क्रूर आणि नरसंहारासारखी’ असल्याचे म्हणत तिने अशा अमानवी कृत्यांचा तीव्र निषेध केला असून तिच्या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
Janhvi on Bangladesh Violence
बांग्लादेशात घडलेल्या एका धक्कादायक मॉब लिंचिंग आणि हिंसाचाराच्या घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने आपला संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीने या घटनेला “क्रूर आणि नरसंहार” अशी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या परखड मतामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
बांग्लादेशात डिसेंबर महिन्यात चार हिंदू नागरिकांच्या निर्घृण हत्या झाल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी यावर परखड मत मांडले आहे. आता जान्हवीने इन्स्टा स्टोरीवर आपले गंभीर मत व्यक्त केलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत जमावाकडून होणारी हिंसा स्वीकारार्ह नसल्याचे सांगत तिने या कृत्यांचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अशा घटनांमुळे माणुसकी हरवत चालल्याची खंतही तिने व्यक्त केली. तिने लिहिले, "बांगलादेशात जे घडत आहे ते क्रूर आहे. हा नरसंहार आहे आणि ही एक वेगळी घटना नाही. आपल्या स्वतःच्या भाऊ-बहिणींना जिवंत जाळले जात असताना आपण जगाच्या दुसऱ्या बाजूला काय घडत आहे याबद्दल आपण रडत राहू. आपली माणुसकी विसरण्यापूर्वी कोणत्याही स्वरूपात अतिरेकीपणाचा निषेध करणे आणि टीका करणे महत्वाचे आहे.''
जान्हवी शिवाय आणखी काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी या लिंचिंगची निंदा केलीय. जया प्रदा, मनोज जोशी यासारख्या कलाकारांनी आपले परखड मत मांडले आहे. लिंचिंगच्या घटनेवर इतर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
जान्हवी व्यतिरिक्त, इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी लिंचिंगचा निषेध केला. अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांनी एका व्हिडिओमध्ये आपले दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, दासची हत्या ज्या क्रूरतेने झाली त्यामुळे ती वेदनादायी आहे. त्यांनी या हत्येला हिंदू धर्मावर हल्ला म्हटले.
अभिनेते मनोज जोशी म्हणाले, "जेव्हा गाझा किंवा पॅलेस्टाईनमध्ये काही घडते तेव्हा प्रत्येकजण पुढे येतो. परंतु जेव्हा बांग्लादेशात एखाद्या हिंदूची हत्या होते, तेव्हा कोणीही पुढे येत नाही..."
गायक टोनी कक्करने "चार लोग" या नवीन गाण्यातून दास यांच्या लिंचिंगचा उल्लेख केलाय.
अभिनेत्री काजल अग्रवालने इन्स्टाग्राम स्टोरीवर "ऑल आईज ऑन बांग्लादेश हिंदूज" अशा मथळ्याचे पोस्टर शेअर केले.