

बिग बॉस मराठी ६ चा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून यंदाचा खेळ पूर्णपणे वेगळा आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नव्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून आगामी सीझनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस मराठी सीझन ६ चा नवा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला असून “यंदाचा खेळ सगळ्यांना चकवा देणार” या टॅगलाईन अंतर्गत व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.
या नव्या प्रोमोमध्ये शोच्या संकल्पनेत काही मोठे बदल करण्यात आल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यावेळी बिग बॉस केवळ टास्कपुरता मर्यादित न राहता खेळाडूंना सतत अनपेक्षित निर्णय घ्यायला भाग पाडणार असल्याचे चित्र दिसते. प्रोमोमधील वेगवान कट्स, गूढ संगीत आणि दमदार संवादामुळे यंदाचा सीझन अधिक थरारक ठरणार, असे संकेत मिळत आहेत.
रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलंय- ''यंदाचा खेळ सगळ्यांना चकवा देणार आहे. बिग बॉस मराठीचं दार उघडणार, नशिबाचा Game पालटणार! ‘बिग बॉस मराठी’ ११ जानेवारीपासून रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि @jiohotstar वर''
प्रोमो मध्ये सहाव्या सीझनच्या कार्यक्रमाच्या थीम विषयी कल्पना आणि सेटची दृश्ये दिसतात. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. फक्त हा खेळ केवळ मनोरंजनापुरता नाही तर गेमने स्पर्धकांची डोकेदुखी वाढणार आहे. “फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक शब्दांत रितेश देशमुखने प्रोमोची सुरुवात केलीय. आता नव्या सीझनमध्ये काय ट्विस्ट असणार? कोण होणार पास तर कोण होणार नापास? या सगळ्याची उत्तरे सीझन सुरु झाल्यानंतरच मिळणार आहे.
प्रोमोमध्ये काय?
प्रोमोमध्ये दिसते की, यंदाच्या सीझनची थीम वेगळी असेल. रितेश एका हटके लूकमध्ये दिसत आहे. घराची रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट..दारापल्याडचं surprise…..ठरवेल प्रत्येकाची वाट; यामुळे प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो, असा ठाम इशारा प्रोमो पाहायला मिळतो आहे. बिग बॉसचं घर नक्की कसं दिसणार? नक्की काय सरप्राईझेस असणार? आणि क्षणात गेम कसा पालटणार? या प्रश्नांची सध्या चर्चा सुरु आहे.
कधी पाहता येणार बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी सिझन ६ हा शो ११ जानेवारीपासून रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहता येणार आहे.