

Aamir Khan-Genelia Sitaare Zameen Par song released
मुंबई - 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'गुड फॉर नथिंग' ला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमिरची खानच्या या चित्रपटाचा कॉमेडी ट्रेलर देखील सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला होता. २००७ मध्ये सुपरहिट ठरलेला तारे जमीन पर या चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे.
'गुड फॉर नथिंग' या गाण्यात आमिर खान त्याच्या बास्केटबॉल संघाला प्रशिक्षक गुलशनच्या भूमिकेत प्रशिक्षण देताना दिसत आहे. हे गाणे पाहणे खूप मजेदार आहे. प्रशिक्षक गुलशन त्याच्या उर्जेने प्रशिक्षणात जीवंतपणा आणतात, तर त्याची टीम शिकताना मजा करतानाही दिसते.
'गुड फॉर नथिंग' हे गाणे शंकर महादेवन आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी त्यांच्या मजेदार शैलीत गायले आहे. नील मुखर्जी यांनी गिटारवर आणि शेल्डन डिसिल्वा यांनी बासवर अद्भुत वाद्यांची साथ दिलीय. आमिर खान प्रॉडक्शनने अरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या १० उदयोन्मुख तार्यांना सादर केले आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन्स हे सोबत मिळून 'सितारे जमीन पर' आणत आहेत. प्रसन्ना यांनी यापूर्वी ब्लॉकबस्टर 'शुभ मंगल सावधान'चे दिग्दर्शन केले आहे.
हा चित्रपट २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 'सितारे जमीन पर' मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची गाणी अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी रवी भागचंडका यांच्यासोबत केली आहे.