

Kantara Chapter 1 Box Office Collection across 600 crore rupees
मुंबई - ऋषभ शेट्टी रुक्मिणी वसंत स्टारर चित्रपट कांतारा: चॅप्टर १ ने ६०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केलीय. बॉक्स ऑफिसवर कांतारा हिट ठरला असून दुसऱ्या वीकेंडमध्ये भरपूर फायदा चित्रपटाला मिळाला. कांतारा चॅप्टर १ ने शनिवार -रविवारी एकूण ७९ कोटींचे कलेक्शन केलं आहे. सोबतच कांतारा चॅप्टर १ ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी ७.१० कोटी, शनिवारी १४.३७ कोटी, रविवारी १४.६५ कोटी कमावले आहेत. एकूण १४६.२२ भारतीय बॉक्स ऑफिसवर हिंदी पट्ट्यातील हे कलेक्शन आहे.
पहिला आठवडा : ११.१० कोटी
वीकेंड दुसरा : ३६.१२ कोटी
एकूण : १४६.२२ कोटी रुपये
कांतारा: चॅप्टर १ ची ११ व्या दिवशीची कमाई
रिपोर्टनुसार, दुसऱ्या रविवारी रविवार जवळपास ४० कोटींचा गल्ला मिळवून भारतातीतल एकूण कलेक्शन ४७८.६५ कोटी रुपये झाले.
होमेब्ले फिल्म्सने इन्स्टाग्रामवर पोस्टक करून माहिती दिली होती की, कांतारा चॅप्टर १ ने ५०० कोटी पार केले आहेत. जगभरात त्याची कमाई पहिल्या आठवड्यात ५०९.२५ कोटी झालीय. रिपोर्टनुसार, कांतारा चॅप्टर १ ने भारतात ११ दिवसात ४७८.६५ कोटींचे कलेक्शन केलं. आता वर्ल्डवाईड पाहता दुसऱ्या आठवड्यात ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.