

Kantara Chapter 1 Box Office Records
मुंबई - ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर १ हा सिनेमा २०२५ चा सर्वाधिक कमाई चित्रपट ठरला आहे. नऊ दिवसात कन्नड आणि हिंदी भाषेत शानदार प्रदर्शन केलं. तर तेलुगू, तमिळ पट्ट्यातही अधिक कमाई झाली. रिपोर्टनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्व भाषेत ३६९.०४ कोटींची कनाई केली तर जीएसटीसह याची कमाई ४२४.५ कोटी झालीय. त्यामुळे २०२५ मधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. कांताराने अनेक चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत.
हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज झाला होता. पण, केवळ छावा आणि सैयाराचे वर्ल्डवाईड कलेक्शन कांतारा चॅप्टर १ तोडू शकला नाही. आता चित्रपटाने रजनीकांत आणि आमिर खानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.
कांतारा: चॅप्टर १ - ३६९.०४ कोटी (९ दिवसात)
छावा- ६१५.३९ कोटी
सैयारा- ३३७.६९ कोटी
कुली- २८५ कोटी
महावतार नरसिंह -२४७.९६ कोटी
कांतारा चॅप्टर १ ने ओपनिंग डे ला ६१.८५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. त्यानंतर शुक्रवारी ४५.४ कोटी रुपये कमावले. शनिवारी ५५ कोटी, रविवारी ६३ कोटी. रिलीज नंतर पहिल्या सोमवारी ३१.५ कोटी रुपये, मंगळवारी ३४.२५ कोटी, बुधवारी २५.२५ कोटी, गुरुवारी २१.१५ कोटी, शुक्रवारी २२.३५ कोटी, शनिवारी ९.२९ कोटींचा बिझनेस केला आहे.