HBD Amitabh Bachchan | ‘फक्त ५ मिनिटे उशीर झाला तरी माफी!’ अमिताभ बच्चन यांच्या वेळेच्या शिस्तीबाबत अनोखा किस्सा, वाचाच

HBD Amitabh Bachchan | ‘फक्त ५ मिनिट उशीर झाला तरी माफी!’ अमिताभ बच्चन यांच्या वेळेच्या शिस्तीबाबत अनोखा किस्सा
Amitabh Bachchan
happy birthday Amitabh BachchanInstagram
Published on
Updated on

happy birthday Amitabh Bachchan

मुंबई - महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ११ ऑक्टोबर रोजी ८३ वा वाढदिवस आहे. आज संपूर्ण जग अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे वेडे आहे. केवळ अभिनयच नाही तर शिस्त आणि भाषेवरील प्रभुत्त्व त्यांना सर्वगुणसंपन्न बनवते. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त एक अनोखा किस्सा समोर आलाय. ते वेळेचे पक्के कसे होते, शिस्त शिकावी तर त्यांच्याकडून, असा हा किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल. उगाचच त्यांना महानायक म्हटले जात नाही..

happy birthday Amitabh Bachchan
happy birthday Amitabh BachchanInstagram

एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, ‘भूतनाथ’चे दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी त्यांना अमिताभ बच्चन यांच्या विषयी आलेले अनुभव सांगितले.

Amitabh Bachchan
Manache Shlok Controversy | 'मनाचे श्लोक'वरून वाद, हायकोर्टाच्या ग्रीन सिग्नलनंतरही पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी शो बंद पाडला

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अलीकडेच ‘भूतनाथ’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी अमिताभ यांच्या शिस्तप्रिय स्वभावाबद्दल एक मनोरंजक अनुभव सांगितला आहे. अमिताभ बच्चन सध्या ८३ वर्षांचे असूनही त्यांच्या कामातील समर्पण त्यांनी सांगितलेल्या किस्सामधून कळते. ‘कालापाणी’, ‘भूतनाथ’, ‘पिकू’ आणि ‘गुडबाय’सारख्या चित्रपटांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

happy birthday Amitabh Bachchan
happy birthday Amitabh BachchanInstagram

पाच मिनिटे उशीर झाला तर मागतात माफी

विवेक शर्मा यांनी सांगितले की, ''भूतनाथ'च्या शूटिंगवेळी मी मेहबूब स्टुडिओमध्ये होतो. अमिताभना केवळ ५ मिनिटे उशीर झाला होता. त्यांनी माझ्याकडे स्वत: मेसेजवर माफी मागितली आणि लिहिलं - 'मी पाच मिनिटे लेट होत आहे.' मलाखूप खंत वाटली. मी म्हणालो, दादा असे म्हणू नका. पण त्यांनी गांभीर्याने सांगितले की, 'नाही विवेक, मला ११:३० ला यायचं होतं. आणि मी ११:३५ ला आलो. यासाठी मी माफी मागतो.' या छोट्या पाच मिनिटाने मला स्तब्ध केलं.''

‘त्यांनी मला डेट नाही दिली तर अनेकदा मी त्यांच्यावर चिढतो. पण, तुम्हाला पटणार नाही, ते माझे पूर्ण बोलणे ऐकतात, माझा राग बघतात...शांत राहतात आणि सांगतात की- योग्य वेळेत योग्य काम होईल. त्यांच्यामध्ये धैर्य आहे, ते आजच्या कुठल्याही अभिनेत्यामध्ये नाही. त्यांना लोकांना आणि परिस्थितीला सांभाळणे येते.'

Amitabh Bachchan
Haq Film Legal Notice: इमरान हाशमी-यामी गौतमचा ‘हक’ चित्रपट विवादात! शाह बानोच्या मुलीचा गंभीर आरोप – 'विना परवानगी बनवला चित्रपट'
happy birthday Amitabh Bachchan
happy birthday Amitabh BachchanInstagram

दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी सांगितले की, 'नेहमी बॉलिवूडमध्ये स्टारडम मिळाल्यानंतर लोक गर्विष्ठ होतात. पण, अमिताभ नेहमी नम्र आणि शिस्तबद्ध राहिले आहे. विवेक यांनी ही खास गोष्ट सांगितली की, कोरोना नंतर ते सॅनिटाईज्ड बबल वा स्टुडिओमध्ये शूट करणं पसंत केलं. सेटवर ते उत्साहात यायचे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news