BB Marathi | "बोलायचं भान नाही, त्याला या घरात स्थान नाही", रितेशने निक्कीला सुनावले

पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुखने घेतली निक्कीची शाळा
Bigg Boss Marathi New Season
निक्की तंबोलीच्या वागम्याने रितेश देशमुख भडकला Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेतली. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील उद्धट सदस्यांना सडेतोड उत्तर दिले गेले आहे.

Bigg Boss Marathi New Season
Instagram
Bigg Boss Marathi New Season
सलमान खान घेऊन येतोय Bigg Boss 18; कंटेस्टेंट फायनल?

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तंबोलीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिला प्रत्युत्तर दिले.

Bigg Boss Marathi New Season
Lakhat Ek Amcha Dada | लाखात एक आमचा दादा : सूर्या, तुळजासाठी आगीत उडी टाकणार!

निक्की तंबोली 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेतली. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय."

Bigg Boss Marathi New Season
जय जय स्वामी समर्थ : भक्ताला मिळणार जीवनदान

रितेश पुढे म्हणाला,"'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंच ठरवणार".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news