

मुंबई - मनालीमध्ये खासदार कंगना रनौत यांच्या विरोधात स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला. पतलीपुलमध्ये लोकांनी 'कंगना गो बॅक'च्या घोषणा दिल्या. मंडीच्या अनेक भागांची पाहणी करून त्या संध्याकाळी उशीरा मनाली पोहोचल्या. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीनंतर खूप उशीराने कंगना तिथे पोहोचल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. हिमाचल प्रदेशातील मंडीच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांना मनालीमध्ये जनतेच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. हिमाचलमध्ये मान्सून आपत्ती असतानानाही त्या वेळेवर पोहोचल्या नाहीत. यावेळी लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.
हिमाचल प्रदेशातील अनेक भागात मुसळदार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झालीय. आज पतलीकूहल गावात कंगना पोहोचल्या. यावेळी काही लोकांनी काळे झेंडे दाखवत 'कंगना गो बॅक'च्या घोषणा दिल्या. यावेळी दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पण, परिस्थिती बिघडण्याआधी पोलिसांनी नियंत्रणात आली.
कंगना यांनी सांगितलं की, त्या दिल्लीमध्ये असतानादेखील आपल्या मतदारसंघातील अनेक मुद्दे दिल्लीमध्ये उपस्थित करत होत्या आणि केंद्रीय मंत्र्यांची सातत्याने भेट घेत आहेत. आता वैयक्तिकरित्या आपत्तीग्रस्त क्षेत्रांचा दौरा करायला त्या आल्या असून पीडित लोकांच्या परिवाराची भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकारकडून राज्याला राज्याच्या आपत्ती निधीच्या १०० पट रक्कम मिळाली, असल्याचा दावा कंगना यांनी केला. त्या म्हणाल्या, प्रत्येक राज्याचा स्वतःचा आपत्ती निधी आहे आणि हिमाचल प्रदेशला त्या रकमेच्या १०० पट रक्कम मिळाली आहे.
मनाली पोहोचल्यानंतर कंगना यांनी सोलंगनालाचा दौरा केला आणि भूस्खलनग्रस्त सोलंग गावच्या लोकांशी बातचीत केली. तसेच पलचान, बाहंग, समाहण या क्षेत्रांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. पुढे कंगना मनाली गाव, कुल्लू च्या १७ मील, बिंदु ढांक, १५ मील, पतलीकूहल, नेरी, डोहलुनाला आणि रायसन भागाचा दौरा करणार आहेत.