The Bads of Bollywood | समीर वानखेडे यांच्याशी संबंधित सीनवर सोशल मीडियावर तुफान कॉमेंट्स
The Bads of Bollywood stream on netfix
मुंबई : शाहरुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरअंतर्गत तयार झालेली वेब सीरीज द बॅड्स ऑफ बॉलीवूडमधून त्यांचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तो २७ वर्षांचा आहे. त्याचे काम पाहून अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे की, आर्यन शाहरुखपेक्षा टॅलेंटेड आहे. तो बालकलाकार म्हणून कभी खुशी कभी गम चित्रपटामध्ये शाहरुखच्या बालपणीच्या भूमिकेत दिसला होता. शिवाय त्याने द लॉयन किंग (हिंदी डब) मध्ये सिंबाचा आवाज दिला होता.
ही सीरीज बॉलीवूडवर आधारित आहे. कॉमेडी ड्रामा असून चित्रपट इंडस्ट्रीतील नेपोकिड्स आणि आऊटसायडर्सवर आधारित आहे. या सीरीजमध्ये लक्ष्य राणा, राघव जुयाल, आन्या सिंह, सहर बांबा, मोना सिंह, बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय मनोज पाहवा, गौतमी कपूर, मनीष चौधरी, रजत बेदी महत्वाच्या भूमिकेत असतील.
सीरीजमध्ये करण जोहर, एस. एस. राजामौली, बादशाह, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंह, दिशा पटानी आणि शाहरुख खान यांचा कॅमियो आहे. ‘बॅड्स ऑफ बॉलीवुड’च्या प्रतीक्षेनंतर आता अखेरीस नेटफ्लिक्सवर सीरीज स्ट्रीम झालीय. शोचे ७ एपिसोड आले आहेत. सर्व एपिसोड १ तासांपेक्षा कमी आहे.
बॉलिवूड स्टार्सकडून कौतुकाचा वर्षाव
राहुल ढोलकिया, सुनीता गोवारिकर, सुनील शेट्टी, अक्षय कुमार अशा स्टार्सनी आर्यनचे तोंडभरून कौतुक केले आहे.
लाईमलाईटमध्ये सुहाना खान
यावेळी सुहाना खानने ४.५ लाख रुपयांचे यलो वर्साचे गाऊन परिधान केले होते. तिचे हाय स्लिट गाऊन आणि मिनिमम ज्वेलरीत ग्लॅमरस दिसत होती. पण, खान परिवारातील अन्य सदस्यांनी ऑल ब्लॅक लूक केला होता.
समीर वानखेडे यांच्या दृश्यानंतर नेटकऱ्यांचा कॉमेंट्सचा पाऊस
शो पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी सोशल मीडियावर कॉमेंट्स दिल्या आहेत. या सीरीजमध्ये एक सीन सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. समीर यांनी आर्यनला कथितपणे ड्रग्स केसमध्ये अटक केली होती. या सीनवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

