कंनगा रनौत Koo ॲपवर ठरली ‘नंबर.1’ सेलिब्रिटी, फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या घरात
कंनगा रनौत Koo ॲपवर ठरली ‘नंबर.1’ सेलिब्रिटी, फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या घरात

कंगना रनौत Koo ॲपवर ठरली ‘नंबर १’ सेलिब्रिटी, फॉलोअर्स लाखोंच्या घरात

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री कंगना रानौत ने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. कंगना रानौत तिच्या सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. ती सातत्याने तिचे नवे फोटो आणि आगामी प्रोजेक्टच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना रनौत नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपलं परखड मत व्यक्त करताना दिसते. यातील काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला अनेकदा टीकेचे धनी ठरवले जाते. यातीलच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना रनौतला मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरवरून सस्पेंड करण्यात आले. ती आता Koo ॲप वर ॲक्टिव्ह आहे.

मात्र, ट्विटरवरून अकाउंट सस्पेंड होताच कंगना रनौतने कू (Koo) ॲपवर एंट्री घेतली. सध्या कू ॲपवर कंनगा रनौतची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता कू ॲपवरील 'नंबर वन' सेलिब्रिटीमध्ये कंगनाने सर्वोच्च स्थान मिळवले आहे. कूवर कंगनाचे १० लाख म्हणजेच १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

कंगना रनौतने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात Koo ॲप वर आपले अकाउंट ओपन केले. आत्तापर्यंत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंगनाचे १० लाखांच्या घरात फॉलोअर्स झाले आहेत. मात्र मागील तीन महिन्यात या फॅन फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कू ॲपवर जबरदस्त परफॉर्मस दाखवत १० लाखांपर्यंत फॉलोअर्स असणारी कंगना पहिली अभिनेत्री ठरली आहे.

कंगनाने Koo ॲप वरील आपल्या बायोमध्ये लिहिले की, 'देश भक्त' आणि सळसळत्या रक्ताची क्षत्रिय महिला. कंगनाने कू ॲपवरूनच आपल्या थलाइवी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले.

कूवर एंट्री घेताच कंगनाने पहिले कू केले ज्यात म्हटले की, कू घरी आल्यासारखे वाटते. बाकी सर्व भाड्याचे वाटते. कंगना फेब्रुवारी २०२१ वरून कूवर असून तिचे अकाउंट व्हेरिफाई करण्यात आले आहे.

हेही वाचलत का :

ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news