

Jolly LLB 3 Worldwide Collection
मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय कोर्टरूम ड्रामा ‘जॉली एलएलबी ३’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडत असून, चित्रपटाने देशांतर्गत आणि वर्ल्डवाईड मार्केटमध्ये प्रचंड कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने दमदार ओपनिंग घेतली. विशेष म्हणजे, वीकेंडला तर हाऊसफुल शोमुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी उसळली.
सुभाष कपूर दिग्दर्शित जॉली एलएलबी फ्रेंचायजीचा तिसरा भाग रिलीज होताच हिट ठरलाय. पहिल्या आठवड्यात केवळ देशात नव्हे तर परदेशातही मार्केटमध्ये चांगला गल्ला जमवला आहे.
अक्षय कुमार-अरशद वारसी स्टारर जॉली एलएलबी ३ मध्ये जगदीश मिश्रा आणिर जगेश्वर त्यागी यांच्या भूमिकेतून परत आलेत. १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.५ कोटी रुपयांचे दमदार ओपनिंग केले होते. पण आठवड्याच्या शेवटी चित्रपटाला चांगला फायदा झाला. शनिवार - रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली.
चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसात ५० कोटी रुपयांचे वर्ल्डवाईड कलेक्शन केले आहे. तिसऱ्या दिवशी कलेक्शनच्या आकड्यात वाढ झाली. रिपोर्टनुसार, चित्रपटाने तीन दिवसात जगभरात ७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. देशातील कलेक्शन वगळता केवळ ओवरसीजमध्ये जॉली एलएलबी ३ चा आकडा ११.०१ कोटी रुपये आहे.
‘जॉली एलएलबी ३’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग मिळवली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. यानंतर शनिवारी कमाईत मोठी झेप घेत २० कोटी रुपये मिळवले, तर रविवारी आणखी विक्रमी २१ कोटी रुपये मिळवले. अशा प्रकारे केवळ तीन दिवसांतच ‘जॉली एलएलबी ३’ चा देशांतर्गत नेट कलेक्शन ५३.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.