

Navratri in Bollywood
मुंबई - नवरात्रीच्या पवित्र उत्सवामुळे संपूर्ण देशात सध्या उत्साह आणि भक्तीचे वातावरण आहे. प्रत्येकजण देवीच्या आराधनेत, गरब्याच्या रंगात आणि पारंपरिक उत्सवामध्ये सहभागी होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. नुकतेच अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेत्री हिमांशी खुराना यांनी नवरात्रीचा आनंद आपल्या खास पद्धतीने साजरा केला. सोबत अन्य कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माधय्मातून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भूमी पेडणेकरने मा काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पारंपरिक पोशाख परिधान करून ती देवीच्या दर्शनासाठी गेली होती. मंदिरातील तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या भक्तीभावाचे कौतूक केले असून, 'ही खरी संस्कृतीची ओळख आहे' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे, हिमांशी खुरानाने देसी अवतारात फोटो अपलोड केले आहेत. सूटमध्ये तिने नवरात्रीच्या उत्सवाचे सेलिब्रेशन केले.
अनुपम यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं-''आप सभी को नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएँ एवं बहुत बहुत बधाई! माता रानी सदैव आपको खुश रखे। आपकी रक्षा करें! जय शेरा वाली माता की! Happy #Navratri''
बिग बॉस १३ फेम हिमांशी खुराना-इन्स्टावर काही फोटो अपलोड केले आहेत. तिने एका फोटोत देसी अवतारात पोज दिलीय. दुसऱ्या व्हिडिओत देवीची पूजा करताना दिसतेय. तिने Happy Navratri अशी कॅप्शन लिहिलीय.
अभिनेत्री भूमी जम्मू काश्मीरमध्ये मां कालीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, जम्मूतील पवित्र बावे वाली माता महाकाली दरबाराकडून, माँ कालीच्या दिव्य आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात शक्ती, ऊर्जा आणि नवीन यश मिळो, अशी कॅप्शन फोटोंना इन्स्टावर दिलीय.
साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालने इन्स्टा स्टोरीवर मातेची रुपे शेअर केली आहेत
अभिनेत्री युविका चौधरीने इन्स्टा स्टोरीवर दुर्गा मातेच्या शक्तीची महती रिल्सद्वारे शेअर केलीय
अंकिताने इन्स्टा स्टोरी शेअर केलीय. त्यामध्ये तिने मुलींनी कोणत्याही कठीण परिस्थितीत स्ट्रॉन्ग राहण्याचा सल्ला दिलाय.