YRF Mardaani 3 Updates | गुन्हेगारांचा उडणार थरकाप, 'मर्दानी-३' मध्ये परतली सुपर कॉप शिवानी शिवाजी रॉय

नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर रिलीज
image of rani mukherjee
YRF Mardaani 3 new poster release Instagram
Published on
Updated on

YRF Mardaani 3 new poster out now

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. तिच्या ‘मर्दानी’ मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. आता पुन्हा एकदा चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

image of rani mukherjee
Dashavatar film 10th Day Collection | 'दशावतार' दस नंबरी! विकेंडचा जबरदस्त फायदा, ओलांडला इतक्या कोटींचा टप्पा

नवरात्रीची सुरुवात खास करत यशराज फिल्म्सने आपल्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मर्दानी-३’चे नवे पोस्टर रिलीज केले आहे. यामध्ये राणी मुखर्जीची शिवानी शिवाजी रॉय या आयकॉनिक भूमिकेने दमदार वापसी केली आहे. वायआरएफने सोशल मीडिया अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे.

शिवानी शिवाजी रॉयची कडक वापसी

महिला पोलिस अधिकारीची भूमिका राणी मुखर्जी पुन्हा एकदा सर्वांच्या मनात घर करणार आहे. तिच्या शूर पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत ती परतत आहे. हातात बंदूक आणि न्याय मिळवण्याची आग यामुळे तिची व्यक्तिरेखा प्रभावशाली आहे. पोस्टरमध्ये बंदूक पकडलेला हात दिसत आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी रिलीज होईल. मर्दानी ३ मध्ये ती एका धोकादायक गुन्हेगारी रॅकेटविरोधात लढताना दिसणार आहे.

image of rani mukherjee
Kantara Chapter- 1 Trailer | आला धमाकेदार ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर-१' चा ट्रेलर! लोककथा अन् दैवी शक्तींचा संगम पाहून भारावले फॅन्स

२०१४ मधील मर्दानी आणि २०१९ मधील मर्दानी २ या दोन्ही चित्रपटांना यश मिळाल्यानंतर, तिसरी फ्रेंचायजी प्रेक्षकांना थेटरमध्ये थरारक अनुभव देणार. दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांचे तर निर्माते आदित्य चोप्रा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news