

Deepika Padukone shares cryptic note joins ShahRukh movie King
मुंबई - बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतेच Kalki 2898 AD हा बहुचर्चित चित्रपट सोडल्याची चर्चा रंगली. या बातमीवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॉमेंट्स येत असतानाच दीपिकाने केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक संदेश शेअर करत म्हटले की-'१८ वर्षांपूर्वीच मला एक धडा मिळाला होता. आयुष्यातील प्रत्येक आव्हान हे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतं. त्याच अनुभवातून मी शिकत आले आहे आणि अजूनही शिकते आहे.' तिची ही भन्नाट पोस्ट फॅन्सचे लक्ष वेधून घेणारी आहे.
'१८ वर्षांपूर्वी ओम शांती ओम चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी मला शिकवलेला पहिला धडा म्हणजे चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि तुम्ही ज्या लोकांसोबत तो बनवता ते त्याच्या यशापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. मी याच्याशी सहमत होऊ शकलो नाही आणि तेव्हापासून मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तो निर्णय लागू केले आहे. आणि म्हणूनच कदाचित आपण पुन्हा एकत्र आपला सहावा चित्रपट बनवत आहोत?'
सोबतच तिने मोठी घोषणा देखील केली आहे की, ती शाहरुख खान सोबत ‘किंग’ करत आहे. दीपिका पदुकोणने शाहरुख खानचा हात पकडलेला एक फोटो पोस्ट केला असून ती 'किंग'चे शूटिंग शुरू करत आहे.
दीपिकाने शाहरुखला टॅग करत लिहिलंय- "किंग आणि डे १."
'किंग'मध्ये शाहरुख खान, अभय वर्मा, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, सुहाना खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
ही पोस्ट चाहत्यांच्या मनाला भावली असून हजारो लोकांनी तिच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. कुणी तिला “बॉलीवूडची खऱ्या अर्थाने क्वीन” म्हटले आहे, तर काहींनी “प्रेरणादायी स्टार” असे संबोधले आहे. एका युजरने म्हटले आहे की, "तू सांगितलंस याचा मला खूप आनंद झाला! मी तुझ्यावर प्रेम करतो." दुसऱ्याने लिहिले, "तू नेहमीच बेस्ट राहा, कोणतीही मंदी तुला स्पर्श करू शकत नाही." रणवीर सिंगने यावर कॉमेट केलीय, तो म्हणाला, "बेस्टेस्ट बेस्टीज!"
सध्या बॉलिवूडमध्ये दीपिकाच्या पुढील प्रोजेक्टबाबत उत्सुकता वाढली असून तिच्या प्रत्येक हालचालीकडे फॅन्सचे आणि इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे.