अभिनेत्री- खासदार जया बच्चन यांच्या रागीट स्वभावाचे किस्से, व्हीडियोज अनेकदा व्हायरल होत असतात. आताही त्यांचा एक असाच किस्सा समोर येत आहे. एका सिनेमादरम्यान जया यांनी चक्क एका अभिनेत्याला काठीने झोडपले. विशेष म्हणजे ज्या सिनेमात जया काम करत होत्या त्यात बिग बीही होते. (Latest Entertainment News)
भोजपुरी कलाकार दिनेश लाल यादव ज्याला निरहुआ म्हणूनही ओळखले जाते. त्याने ही आठवण शेयर केली आहे. याबाबत बोलताना तो म्हणतो, ‘जया खरंच रागीट स्वभावाच्या आहेत. एकदा तर त्यांनी मला काठीने मारले होते.’
निरहुआने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, 'ही त्यांच्या गंगादेवी नावाच्या सिनेमाच्या दरम्यान घडलेली गोष्ट आहे. 2012 मध्ये बिग बी आणि जया बच्चनसोबत गंगा देवी या सिनेमात काम करत होते. निरहुआ याबाबत अधिक सांगताना म्हणतात की, एक सीन होता ज्यामध्ये मला माझ्या ऑनस्क्रीन पत्नीला थप्पड मारायची होती. यानंतर माझ्या आईच्या भूमिकेत असलेल्या जया यांना मला रागवायचे होते आणि मला काठीने मारल्याचा अभिनय करायचा होता. पण अभिनय करण्याऐवजी त्यांनी मला खरोखरीच मारले. त्यांनी मला खरोखरीच जोरात मारले. त्यांनी मला एक दोन वेळा मारले. मी त्यांना त्यावेळी सांगितले की तुम्ही मला खरोखरीच मारत आहात.
यावर जया म्हणाले की तू माझ्या सुनेला का मारत आहेस. त्यावेळी मी सांगितले की हा तर केवळ अभिनय होता पण तुम्ही तर मला खरोखरीच मारले. हे त्यांनी जाणून बुजून केले नसले तरी मला खरोखरीच खूप लागले होते. पण तरीही मी याला एक कौतुकच मानले.’
याशिवाय अलीकडेच जया या सेल्फी घेणाऱ्या एका व्यक्तीला फटकारले होते. हा व्हीडियोही व्हायरल झाला आहे.