

सध्या रिअलिटी शो राईज अँड फॉलची चर्चा जास्त आहे. हटके संकल्पना घेऊन समोर आलेला हा शो आता लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. पण यातील स्पर्धकही शो इतकेच चर्चेत आहे. सध्या या शोमध्ये एका नव्या जोडीची चर्चा आहे. ही जोडी आहे धनश्री वर्मा आणि अरबाज.या दोघांची केमिस्ट्री समोर येण्याचे कारण म्हणजे अरबाज धनश्रीबाबत अनेकदा पझेसिव्ह होताना दिसतो आहे. विशेषत: धनश्री इतर स्पर्धकांशी भेटताना मिठी मारते. अरबाजला ते अजिबात आवडत नाही. तो तिला असे करण्याबाबत विचारतो. (Latets Entertainment News)
यावर धनश्री म्हणते, 'ही माझी पद्धत आहे. मी सगळ्यांची गळाभेट घेते.’ यावर सोशल मिडियावर मात्र चांगलीच वादावादी झालेली दिसते आहे.
पण या सगळ्यावर मात्र अरबाजची गर्लफ्रेंड निकी तांबोळी चांगलीच भडकली आहे. निकीने सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर कमेंट केली आहे. निकीने इन्स्टा स्टोरी ठेवत याप्रकरणी राग व्यक्त केला आहे. आपल्या स्टोरीमध्ये निकी म्हणते, ‘अपना तो एकही उसूल है, यारी मे गद्दारी नही और गद्दारोंसे यारी नही.’ यानंतरही निकिने दुसारी स्टोरी शेयर केली आहे. ज्यात ती म्हणते, ‘जब शिकार का समय होगा, जंगल मे हम खुद आयेंगे.’ काय होती नेटीझन्सची रिएक्शन? अरबाजचा हा व्हीडियो व्हायरल होताच त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. याबाबत अनेकांनी अरबाजविरोधी कमेंट केल्या आहेत. अनेकांच्या मते, प्रत्येक रिअलिटी शोची हीच तऱ्हा आहे. प्रत्येकात तो कोणाच्या तरी मागे असतोच.
बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनमध्ये निकी आणि अरबाज ही जोडी एकत्र होती. यांची आधी मैत्री मग प्रेम असा प्रवासही प्रेक्षकांच्या समोरच घडला.
अशनीर ग्रोवर होस्ट करत असलेल्या या शो अल्पावधीतच लोकप्रिय शोच्या यादीत पोहोचला आहे.
हा शो अमेझोन प्राइमवर प्रसारित होतो आहे.
जवळपास 42 दिवस या शोचा कालावधी आहे.
या शोमध्ये अर्जुन बिजलानी, नयनदीप रक्षित, आदित्य नारायण, पवन सिंह, किकू शारदा, कुब्रा सैत, आरुष भोला, अहाना कुमरा, संगीता फोगट, अनाया बांगर, बाली, आकृति नेगी और नूरिन शा. हे स्पर्धक आहेत.