

अभिनेता गौरव मोरे सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये दिसतो आहे. आपले कॉमिक टायमिंग आणि हटके अंदाजाने तो अनेकांचा आवडता बनला आहे. पण आता गौरवने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनेविषयी शेयर केले आहे. गौरवने नवे घर घेतले आहे. (Latest Entertainment News)
गौरवने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. गौरव आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, ‘(ताडपत्री ते फ्लॅट)
फ़िल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो,पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असाव हे कायम मनात होत.लहानपणापासुन वाटत होत जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खरया अर्थाने सत्यात उतरलं आणि काल दिनांक२५-९-२०२५ रोजी आम्हाला आमच्या पवई च्या नवीन घराचा ताबा मिळाला.
ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आल आणि वाटल आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केल.माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही.’
अर्थात अनेकांनी यावर गौरवचे अभिनंदन केले आहे. गौरवच्या या पोस्टवर सहकलाकार श्रेया बुगडे म्हणते, ‘गौऱ्या तू करून दाखवलेस; तुझा अभिमान वाटतो.’ तर अभिनेता प्रथमेश परबने 'माझा भाऊ' अशी कमेंट केली आहे.
अभिजीत खांडकेकरने 'तुझा अभिमान वाटतो' अशी कमेंट केली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही ' किती छान. तुझा अभिमान वाटतो गौरव. तुझ्यासाठी खूप आनंदी आहे अशी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हास्यजत्रेनंतर गौरव सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमात दिसला होता. यानंतर त्याने झी मराठीवर चला हवा येऊ द्या मध्ये वर्णी लावली आहे.