Janhvi Kapoor Param Sundari First Look| 'ये परम सुंदरी'..जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्राचा फर्स्ट लूक रिलीज

Sidharth Malhotra-Janhvi Kapoor | परम सुंदरी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला असून सिद्धार्थ - जान्हवीची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळतेय
image of Janhvi Kapoor - Sidharth Malhotra
Janhvi Kapoor Param Sundari First Look out x account
Published on
Updated on

Sidharth Malhotra-Janhvi Kapoor First Look released

मुंबई - जान्हवी कपूरच्या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट असले तरी आता चर्चा आहे तिच्यया परम सुंदरी या चित्रपटाची. त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. 'परम सुंदरी' हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच एक नवीन रोमँटिक ड्रामा पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. आज गुरुवारी निर्मात्यांनी सरप्राईज दे. परम सुंदरीचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. युटु्यूबवर या लूकचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

'परम सुंदरी' या चित्रपटाचा पहिला लूक मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तुषार जलोटा दिग्दर्शित वर्षातील सर्वात मोठी प्रेमकथा २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. परम सुंदरीचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे." परम सुंदरीच्या पहिल्या लूकबद्दल बोलताना, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जान्हवी कपूर दोघांचीही पहिली झलक दिसते.

image of Janhvi Kapoor - Sidharth Malhotra
Ramayana Actor Yash First Look | नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’च्या सेटवरून यशचा पहिला लुक समोर

'परम सुंदरी' कधी प्रदर्शित होणार?

सिद्धार्थ कूल लूकमध्ये दिसत आहे. तर जान्हवी दक्षिण भारतीय लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. सोनू निगमचा आवाज फॅन्सना खूप पसंतीस पडला आहे. याशिवाय, अनेक सोशल मीडिया युजर्सनी निर्मात्यांना 'सुन लो अगर' हे गाणे लवकरात लवकर रिलीज करण्याची मागणी केली आहे. एका उत्तर भारतीय मुलगा दक्षिण भारतीय मुलीच्या प्रेमात पडतो, अशी कथा परम सुंदरीची आहे.

image of Janhvi Kapoor - Sidharth Malhotra
Kunal Kamra Controversy | महाराष्ट्रात लवकरच पाच शो, शिंदेंच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा; कामराने पुन्हा डिवचलं

हे दोघे पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करत आहेत. मॅडॉक फिल्म्स निर्मित, ही रोमँटिक प्रेमकथा अनुप जलोटा दिग्दर्शित आहे आणि २५ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news