Jailer 2 : |'जेलर 2'मध्ये ऋतिक रोशनची दमदार एन्ट्री? कॅमिओचे शूटिंग पूर्ण, रजनीकांत यांच्या घरी खास भेट

Jailer 2 : | 'जेलर 2'मधील कॅमिओचे शूटिंग पूर्ण; ऋतिक रोशनने घेतली रजनीकांत यांच्या घरी भेट, चाहते उत्साहित
Rajinikanth - Hritik Roshan
Hritik Roshan visited Rajinikanth house after completed jailer 2 cameo shoot pudhari photo
Published on
Updated on

सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर २' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन विशेष कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋतिकने आपल्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण केले असून त्यानंतर तो रजनीकांत यांच्या घरी गेल्याचे समोर आले आहे. दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रजनीकांत यांच्या घरी पोहोचला ऋतिक

सोशल मीडिया X वर एका युजरने रजनीकांत आणि ऋतिक रोशन यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. फोटोसोबत कॅप्शनमध्ये 'जेलर 2'मधील कॅमिओचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ऋतिकने रजनीकांत यांच्या घरी भेट दिल्याचे म्हटले आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Facebook snapshot
Rajinikanth - Hritik Roshan
Anshula Kapoor| 'क्षणासाठी असं वाटलं की, पुन्हा एकदा आईच्या मिठीत विसावले', लग्नानंतर अंशुलाने शेअर केला भावूक व्हिडिओ

चित्रपटात ऋतिकचा कॅमिओ

सूत्रांनुसार, दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांनी ऋतिक रोशनसाठी चित्रपटात खास भूमिका तयार केली आहे. त्याच्या वाट्याला एक दमदार सिक्वेन्स आला असून त्यानंतर रजनीकांत यांच्यासोबत त्याचा महत्त्वाचा सीनही आहे. हा कॅमिओ केवळ आकर्षणासाठी नसून कथेला निर्णायक वळण देणारा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

'जेलर'च्या यशानंतर येतोय सीक्वेल

'जेलर 2' हा रजनीकांत यांचा सुपरहिट अॅक्शनपट 'जेलर'चा सीक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे. रजनीकांत हे मुथुवेल पांडियन या आपल्या लोकप्रिय भूमिकेत पुनरागमन करणार आहेत.

Rajinikanth - Hritik Roshan
Peddi box office closing collection: बॉक्स ऑफिसवर दमदार मजल; राम चरणचा 'पेड्डी' टॉलीवूडच्या टॉप १० कमाई करणाऱ्या चित्रपटांत

रजनीकांत-ऋतिक ४० वर्षांनंतर पुन्हा एकत्र

रजनीकांत आणि हृतिक रोशन यांनी १९८६ मधील 'भगवान दादा' या हिंदी चित्रपटात एकत्र काम केले होते. जे. ओम प्रकाश यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर बालकलाकार म्हणून हृतिक रोशनने त्यांच्या दत्तक मुलाची भूमिका केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news