Anshula Kapoor| 'क्षणासाठी असं वाटलं की, पुन्हा एकदा आईच्या मिठीत विसावले', लग्नानंतर अंशुलाने शेअर केला भावूक व्हिडिओ

Anshula Kapoor| क्षणासाठी मला असं वाटलं की मी पुन्हा एकदा आईच्या मिठीत विसावले... लग्नानंतर अंशुलाने भावूक व्हिडिओ केला शेअर
Anshula Kapoor
Anshula KapoorPUDHARI PHOTO
Published on
Updated on
Summary

रोहन ठक्करशी विवाहानंतर अंशुला कपूरने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. लग्नाच्या दिवशी आईच्या अत्तराचा सुगंध पुन्हा तयार करून तो स्वतःवर फवारल्यावर क्षणभर आपण पुन्हा आईच्या मिठीत असल्यासारखे वाटल्याची भावना तिने व्यक्त केली. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.

चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची कन्या अंशुला कपूर हिने नुकताच रोहन ठक्करसोबत विवाह केला. लग्नानंतर अंशुलाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक भावनिक व्हिडिओ आणि त्यासोबतची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपल्या दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना तिने व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या मनाला भिडल्या आहेत.

चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची कन्या अंशुला कपूर हिने नुकताच रोहन ठक्करसोबत विवाह केला. लग्नानंतर अंशुलाने सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपल्या आई मोना शौरी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या पोस्टने अनेकांचे मन हेलावून टाकले आहे.

Anshula Kapoor
Thalapathy Vijay Jana Nayagan release date|'जन नायकन' कधी प्रदर्शित होणार? विजय यांच्या बहुचर्चित चित्रपटाबाबत मोठे अपडेट

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंशुलाने सुगंध आणि आठवणी यांच्यातील नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या. "लोक म्हणतात, एखादा सुगंध आठवणी जाग्या करण्याची सर्वात मोठी ताकद ठेवतो. त्यामुळे लग्नापूर्वी माझ्या मनात एक प्रश्न होता. एखाद्या सुगंधात भावना जपता येतात का? तो मला एखाद्या मिठीची आठवण करून देऊ शकतो का? ज्या व्यक्तीची मला सर्वाधिक आठवण येते, तिच्या जवळ असल्याची जाणीव करून देऊ शकतो का?" असे तिने लिहिले.

Anshula Kapoor
Kay Kay Menon new series Adarsh Baal Vidyalaya|'पंचायत'नंतर आता 'आदर्श बाल विद्यालय'; के.के. मेननची नवी वेबसीरिज कुठे पाहणार?

पुढे ती म्हणते, "मला प्रत्येक छोटी गोष्ट आठवत नाही. पण आईच्या मिठीत मिळणारी सुरक्षिततेची भावना आजही आठवते. तिच्या मिठीतला दिलासा आठवतो आणि तिच्या अत्तराचा मंद सुगंधही आठवतो."

अंशुलाने सांगितले की, तिच्या बॅचलर पार्टीसाठी सोलला गेल्यानंतर तिने आईच्या अत्तराचा तोच सुगंध पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या दिवशी वधू म्हणून तयार झाल्यानंतर बाहेर पडण्यापूर्वी तिने तोच खास सुगंध स्वतःवर फवारला.

या क्षणाचे वर्णन करताना अंशुला म्हणाली, "त्या एका क्षणासाठी मला पुन्हा एकदा आईच्या मिठीत असल्यासारखे वाटले." अंशुलाच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत तिच्या भावना समजून घेत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंशुला कपूर ही बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी कपूर यांची कन्या आहे. आईच्या निधनानंतरही अंशुला अनेकदा तिच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. यावेळी मात्र लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी आईची उणीव तिने अतिशय संवेदनशील शब्दांत व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news