‘IPC’ लवकरच ओटीटीवर, महिन्याला प्रदर्शित होणार एक नवी वेब सीरिज

‘IPC’ लवकरच ओटीटीवर, महिन्याला प्रदर्शित होणार एक नवी वेब सीरिज
IPC movie
आयपीसी वेब सीरीज लवकरच भेटीला येत आहे instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ ही वेब सिरीज अनेक सत्य घटनांपासून प्रेरित क्राईम थ्रिलर सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला एक नवी कोरी वेब सीरिज देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. (IPC)

IPC movie
instagram

या वेब सीरीजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर, सुरेश विश्वकर्मा व अभिनय सावंत यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. कोकणातील छोट्या गावात शिमगोत्सवाच्या दिवशी एका २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार होतो आणि सुरु होते एक रहस्यमय थरारक घटनांची शृंखला जी वास्तवात घेऊन येते कल्पनेच्या पलीकडले सत्य, जे उलगडणार २५ ऑक्टोबरला. (IPC)

IPC movie
instagram

अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, राजेश चव्हाण या सीरीजचे दिग्दर्शक आहेत. राजेश चव्हाण म्हणाले, “मी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे आभार मानतो. त्यांनी त्यांची महत्त्वाची अशी पहिली वेब सीरीज दिग्दर्शन करण्याची संधी मला दिली.”

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news