Cannes 2024 : ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ने ‘कान्‍स’मध्‍ये रचला इतिहास, ग्रँड प्रिक्स अवॉर्डवर मोहर

कान्‍स चित्रपट महोत्‍सवामध्‍ये भारतीय चित्रपट 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ने ग्रँड प्रिक्स पाल्मे डी' पुरस्‍कार जिंकला.
कान्‍स चित्रपट महोत्‍सवामध्‍ये भारतीय चित्रपट 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ने ग्रँड प्रिक्स पाल्मे डी' पुरस्‍कार जिंकला.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मानाच्‍या कान्‍स चित्रपट महोत्‍सवामध्‍ये भारतीय चित्रपट 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'ने ग्रँड प्रिक्स पाल्मे डी' पुरस्‍कार जिंकला आहे. तब्‍बल तीन दशकानंतर कान्‍समध्‍ये या पुरस्‍कारवर भारतीय चित्रपटाने मोहर उमटवली आहे. यापूर्वी १९९४ मध्‍ये शाजी एन करुणचा स्‍वाहम या चित्रपटाने हा पुरस्‍कार पटकावला होता. हा पुरस्‍कार हा महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

७७ व्या कान्‍स चित्रपट महाेत्‍सवाच्‍या शेवटच्या दिवशी नेत्रदीपक पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पायल कपाडियाच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट'ने ग्रँड प्रिक्स पुरस्कारावर मोहर उमटवली. पायल कपाडिया यांचा चित्रपट 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' 23 मे रोजी 2024 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पर्धा विभागात प्रीमियर झाला. या चित्रपट महोत्सवात 30 वर्षांनंतर एका चित्रपटाचा प्रीमियर करण्यात आला. हा चित्रपट स्पर्धा विभागात दाखविण्यात येणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. 30 वर्षांपूर्वी शाजी एन करुण यांचा स्‍वाहम चित्रपट कान्समध्ये नामांकित झाला होता.

'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' चे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे. या चित्रपटाला यंदाच्‍या कान्स 2024 मध्ये पाल्मे डी'ओर श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते; परंतु हा विशेष सन्मानाने त्‍याला हुलकावणी दिली. मात्र या महोत्सवाचा दुसरा सर्वोच्च सन्मान जिंकून इतिहास रचला. पायल कपाडिया यांनी या चित्रपटाचे लेखनही केले होते. थॉमस हकीम, रणबीर दास आणि ज्युलियन ग्रोफ यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.

महिलांचा स्‍वप्‍नपूर्तीसाठीच्‍या संघर्षाची कथा 'ऑल वुई इमॅजिन एज लाईट

'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' चित्रपटात कानी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मुंबईत राहणाऱ्या तीन महिलांची आहे ज्या त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्‍न करताना दिसता.

हेही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news